राजस्थानात घृणास्पद प्रकार; भीलवाडा शहरात स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री

वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानात 21 व्या शतकात देखील केवळ कर्ज न फेडल्याच्या मुद्द्यावर स्टॅम्प पेपर मुलींचे विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असा प्रकार झाल्याची कबुली खुद्द काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेलोत यांनी दिली असून त्याची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत मात्र या मुद्द्यावर आता भाजपने गेलो सरकारला घेतले असून इतके दिवस मुलींच्या विक्रीचे आणि त्यांना गुलाम बनवण्याचे हे प्रकार घडत असताना सरकार झोपले होते का?, असा सवाल भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केला आहे. Disgusting type in Rajasthan; Sale of girls on stamp paper in Bhilwara city

राजस्थानमधील भिलवाडा येथे स्टॅम्प पेपरवर मुलींच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात असल्याच्या बातम्यांची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने तेथील मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे.

 

28 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ही घटना अत्यंत निंदनीय आणि भयानक आहे. या प्रकरणी आयोगाने दोन सदस्यीय पथक स्थापन केले असून, ते राजस्थानमध्ये जाऊन या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत.

मुली विकण्याचे प्रकरण उघडकीस

राजस्थानच्या भिलवाडा गावात कर्ज न फेडल्याच्या बदल्यात स्टॅम्प पेपरवर मुलींची खरेदी-विक्री केली जात आहे. येथील अनेक वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गरीब मुलींची स्टॅम्प पेपरवर दलालांकडून खरेदी-विक्री केली जाते, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या रिपोर्टमध्ये काही मुलींशी प्रत्यक्ष बोलल्याचा दावादेखील करण्यात आला होता. यामध्ये पीडित मुलींनी स्टॅम्प पेपरवर आपली विक्री झाल्याचे सांगितले. तसेच, बलात्कार केल्याचेही त्यांनी सांगितले.

Disgusting type in Rajasthan; Sale of girls on stamp paper in Bhilwara city

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात