पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवडणुकांच्या सभांमध्ये ममता बॅनर्जींना ‘दिदी … ओ दिदी’ म्हण्टले आता तृणमूल कॉंग्रेसने याला महिलांच्या सन्मानाशी जोडले आहे आणि असे म्हटले आहे की पंतप्रधान मोदींनी अशाप्रकारे ममता बॅनर्जी यांना बोलावणे हा अनादर आहे. Didi o didi angry trinoomul mindgame? Modi and Didi face-to-face in West Bengal
विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. मंगळवारी तिसर्या टप्प्यातील मतदान होणार आहे, परंतु त्यापूर्वी तृणमूल कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठा आरोप केला आहे.
बंगाल निवडणुकीतील तिसर्या टप्प्यापूर्वी आणखी एक विषय झपाट्याने उठला आहे. टीएमसीने पंतप्रधान मोदींचे वक्तव्य ‘दिदी ओ दिदी’ ला बंगालच्या महिलांशी जोडले आहे. आता प्रश्न पडतो की आतापर्यंत बॉम्ब-तोफखाना, मां ,मानुष आणि माती, सोनार बांगला या शब्दांमधे ‘दिदी’ सारख्या शब्दांची एंट्री कशी झाली आहे?
पंतप्रधानांच्या ‘ दीदी या शब्दाचा टीएमसीला खरचं त्रास होतो आहे की ममतांचा पक्षाने निवडणुकीच्या खेळात आता मनाची खेळी देखील सुरू केली आहे? मोदी ममता बॅनर्जी यांना मोठ्या प्रेमाने दीदी म्हणतात मात्र हे टीएमसीला रूचत नाही. टीएमसीने याला बंगालच्या महिलांच्या सन्मानाशी जोडले आहे. डेरेक ओ ब्रायन यांनी ट्वीट करुन पंतप्रधानांवर पुन्हा शाब्दिक वार केला तर पक्षाच्या इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राग बाहेर काढला.
काय म्हणतात पंतप्रधान
“दीदी … ओ दीदी … ममता नंदिग्राम मधून पराभूत होणार हे स्पष्ट आहे. दीदी पराजय तुमच्या समोर आहे.तो स्वीकारा.तुम्ही जय श्री राम म्हंण्टले तर चिडता वाराणसीत तर महादेवाचे नावही ऐकावे लागेल.मग दिदी काय करणार? बंगालमध्ये परिवर्तन होणार.
ममता बॅनर्जींचा पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय देव आहेत की सुपरमॅन? जे सांगतात मी हारतेय.मी स्वतः जोपर्यंत बंगाल मधून जाणार नाही तोपर्यंत मला कुणीही येथून काढू शकत नाही.परिवर्तन हा नारा मीच दिलेला आहे. इतका खराब पंतप्रधान मी आयुष्यात नाही पाहिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App