• Download App
    काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे विसरलात का?; राधाकृष्ण विखे-पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला!!|Did you forget that the dagger was stuck in the back of the Congress ?; Radhakrishna Vikhe-Patla's Supriya Sulena Tola

    काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे विसरलात का?; राधाकृष्ण विखे-पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना कोरोना काळातली वस्तुस्थिती मांडली. महाराष्ट्रातून बिहारी आणि उत्तर प्रदेशातल्या जनतेला काँग्रेसच्या नेत्यांनी तिकीटे काढून देऊन पाठवले. त्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला, असा आरोप मोदींनी केला होता.Did you forget that the dagger was stuck in the back of the Congress ?; Radhakrishna Vikhe-Patla’s Supriya Sulena Tola

    या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्राला कोरोनाचा सुपर स्प्रेडर म्हणणे हा महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान आहे. भाजपच्या आमदारांनी, खासदारांनी देखील त्या विरोधात उठून उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.



    आता खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे. आज सुप्रिया सुळे या पंतप्रधान मोदींवर टीका करताहेत. पण राजीव गांधींनी काँग्रेस मध्ये घेऊन ज्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले, त्यांनीच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून नवा पक्ष काढला, हे सुप्रिया सुळे विसरल्या का?, असा खोचक सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री झाल्याच्या मुद्द्यावर त्यांनी बोलले पाहिजे असेही ट्विट विखे पाटील यांनी केले आहे.

    राधाकृष्ण विखे पाटील यांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. शरद पवारांच्या राजकारणाबाबत नेहमी “पाठीत खंजीर खुपसणे” या वाक्प्रचाराचा वापर करण्यात येतो. आधी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला, असा आरोप अनेकांनी केलाच होता. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट मध्ये राजीव गांधी यांचे नाव घेऊन पवारांच्या राजकारणाच्या जुन्या जखमेवरील खपली काढल्याचे मानण्यात येत आहे.

    काय म्हणाल्या सुप्रिया ?सुळे

    खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याने मनस्वी दु:ख झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही. हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही, तर हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्यातील भाजप आमदार, खासदारांनी याविरोधात उभे राहिले पाहिजे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

    लोकशाहीत टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे. तो लोकशाहीने आपल्याला दिला आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा होती की राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना देशाला दिशा देणारे विचार मांडतील परंतु त्यांनी जे वक्तव्य केले त्याने राज्याचा अपमान झाला आहे. पंतप्रधान म्हणून निवडून आल्यावर ते देशाचे पंतप्रधान असतात ते कुठल्या पक्षाचे नसतात याचा विसर त्यांना पडलेला दिसतो अशी टीकाही सुप्रिया  सुळे यांनी केली.

    पंतप्रधानांनी राज्यांना दिशा द्यावी. राज्ये अडचणीत आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. चीनने नवा प्रश्न निर्माण केला आहे. नोकर्‍यांचा प्रश्न आहे.  यावर काही बोलतील या अपेक्षेने देश बघत होता. दुर्दैव की आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलले. महाराष्ट्राने भाजपचे १८ खासदार निवडून दिले. तुम्ही पंतप्रधान आहात, त्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्रातील मतदारांचा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला हे धक्कादायक असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

    भाजपचे पंतप्रधान नाही, तर तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. पंतप्रधान हे पद पक्षाचे नाही ते संविधानाने दिलेले पद आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली. राजकारणाची पातळी इतकी घसरली आहे की आपण माणुसकीही विसरणार आहोत. कोण कुणामुळे कोरोना स्प्रेडर होते हे आत्मपरीक्षण करावे हे नवाब मलिक बोलले ते बरोबर होते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    Did you forget that the dagger was stuck in the back of the Congress ?; Radhakrishna Vikhe-Patla’s Supriya Sulena Tola

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही