काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!
काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ, हेच राजकीय वास्तव भाजप सत्तेवर आल्यानंतर समोर आले.
काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ, हेच राजकीय वास्तव भाजप सत्तेवर आल्यानंतर समोर आले.
12 राज्यांमधील 26 राज्यसभा जागांसाठी गुरुवारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. यापैकी 19 जागा एनडीएला, इंडिया ब्लॉकला 6 आणि एक जागा मिझोरामच्या झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ला मिळाली. या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया ब्लॉकला प्रत्येकी एका जागेचा फायदा झाला.
काँग्रेसने हिंग लावून नाही विचारले, म्हणून विलीनीकरण बारगळले; कबुली देणे भाग पडले!!, अशीच राजकीय अवस्था शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस यांची झाल्याचे चित्र आज वेगवेगळ्या वक्तव्यांवरून समोर आले.
काँग्रेसच्या माघारीचा त्रिफळा; पवार + ठाकरेंकडून राजकीय इज्जतीचा चोळामोळा!!, हेच राजकीय वास्तव आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले.
लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभा परिसीमन विधेयके पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी हर्षवायू झाल्यासारखे लिहिले भारत ने देख लिया, INDIA ने रोक दिया!!, राहुल गांधींच्या या लिहिण्यामुळेच लाडक्या बहिणी कसा आणि कुठे देतील फटका??, असा सवाल ताबडतोब समोर आला.
मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात आणत असलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियम या विषयाला थेट विरोध करता येत नाही म्हणून काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या विरोधकांनी लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध चालवला आहे. त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सुरात सूर मिसळून मोदी सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाला सुप्त विरोध केला आहे. सोनिया गांधी यांनी तर विशेष लेख लिहून आपला विरोध स्पष्ट केला आहे. त्यांच्या पाठोपाठ अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन यांच्यासारख्या मोठ्या प्रादेशिक नेत्यांनी सुद्धा विरोध केला आहे.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामती विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून काँग्रेसने निवडणूक लढवायची तयारी केली. त्या तयारीला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाला.
राहुल गांधींनी ज्या प्रकारे कांशीराम यांच्या राजकीय वारसावर डल्ला मारलाय, ते पाहून उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे सगळे Political Icons संपले का??, असा सवाल तयार झाला तर आश्चर्य वाटायला नको.
ठाकरे आणि पवारांच्या मागे काँग्रेसची फरफट; 14 खासदार आणि 16 आमदार असूनही काँग्रेसला नाही किंमत!!,
काँग्रेसवाले हरले तरी भांडणे आणि जिंकले तरी भांडणेच!!, असला प्रकार त्या पक्षातून समोर आलाय. काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत पराभूत झाला. त्यांनी ठाकरे बंधूंशी फारकत घेतली आणि वंचित बहुजन आघाडीशी युती केली. पण ती दोन्ही पक्षांना राजकीय दृष्ट्या पचली नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेसचे फक्त 24 नगरसेवक निवडून आले. २२७ पैकी 24 हा परफॉर्मन्स बघून काँग्रेसचे मुंबईतले नेते भडकले.
सुरेश कलमाडी लक्षात राहतील, ते पुण्यातल्या काँग्रेसचे अखेरचे धुरंधर नेता म्हणून!! कर्नाटकातून पुण्यात येऊन संपूर्ण पुणे शहर काँग्रेसचे नेतृत्व मिळविणे तसे सोपे नव्हते. कारण सुरेश कलमाडी ज्यावेळी पुण्यात आले, त्यावेळी पुण्याच्या काँग्रेसमध्ये मोठ्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक यांचे नेतृत्व तेव्हा पुण्याच्या क्षितिजात चमकत होते. आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर गाडगीळ आणि टिळक हे दोघे पुण्याचे “कारभारी” होते. त्यावेळी पुण्यात काँग्रेसचे दोन गट होते. एक गट गाडगीळांचा, तर दुसरा गट टिळकांचा.
गजनीच्या मोहम्मदाने पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ वर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्या 1000 वर्षांमध्ये प्रचंड संघर्ष झाले. सोमनाथाचे मंदिर पुन्हा दिमाखाने उभे राहिले. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास लेख लिहिला. भारतावर झालेल्या आक्रमणाची आणि भारतीयांनी संघर्ष करून मिळविलेल्या विजयाची आज आठवण करून दिली.
महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागपुरात महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे. जागावाटपाच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेरच्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातील युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी काँग्रेसवर जाणीवपूर्वक दगाबाजी केल्याचा गंभीर आरोप करत, आता आमचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र, तर अन्य२८ महापालिकांमध्ये आघाडी करून निवडणूक लढवायला तयार असल्याची भूमिका आज काँग्रेसने मांडली. त्यामुळे ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पासून काँग्रेसने फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र तळ्यात मळ्यात आजही कायम राहिले.
सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली असल्याचे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. तसेच पाच वर्षे आमदारकी शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला यावरूनच कळते कॉंग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही. माझे मित्र विरोधी पक्षनेता होणार म्हणून बसले होते. मात्र, बिचाऱ्यांचे दुर्दैव असल्याचा खोचक टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.
केरळ मधल्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा पराभव झाला आणि काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट जिंकले, ही झाली जुनी बातमी.
केरळ मधून काँग्रेस साठी आनंदाची बातमी आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने सत्ताधारी कम्युनिस्टांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट वर मात करून बहुतांश महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये बहुमता कडे वाटचाल सुरू केली.
पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरम्ला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या चर्चेची सुरुवात केली. त्यांनी एका तासाच्या भाषणात सांगितले की, ‘वंदे मातरम् ब्रिटिशांना सडेतोड उत्तर होते, ही घोषणा आजही प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधींनाही ते आवडले होते. त्यांना हे गीत राष्ट्रगीत म्हणून दिसत होते.
भाजपने गुरुवारी आरोप केला की, काँग्रेस परदेशी सोशल मीडिया खात्यांद्वारे भारतात गृहयुद्ध भडकावण्याचा कट रचत आहे. ही खाती पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर आणि अमेरिकेसह इतर देशांमधून चालवली जात आहेत. राहुल गांधी आणि डाव्या नेत्यांच्या सांगण्यावरून भारताची प्रतिमा खराब केली जात आहे.
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या अटकळांदरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. गुरुवारी सकाळी शिवकुमार यांनी X वर आपला फोटो पोस्ट केला आणि लिहिले- वर्ड पॉवर इज वर्ल्ड पॉवर (Word Power is World Power) म्हणजे आपले शब्द (वचन) ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे.
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेवर मंगळवारी एकाच दिवशी काँग्रेस अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची विधाने आली. उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले- मी मुख्यमंत्री बदलावर सार्वजनिकरित्या काहीही बोलणार नाही, हा आमच्या 4-5 लोकांच्या मधला गुप्त करार आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचारयात्रा, सभा आणि शक्तीप्रदर्शनाला वेग दिला आहे. अशातच आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिममध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक प्रचारासाठी मालेगाव शहरात आलेल्या बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेतृत्व, अंतर्गत भांडणं आणि विकासाच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीवरही टीकेची झोड उठवली.
२०२६च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्रपक्ष द्रमुकसोबत जागावाटपाची औपचारिक वाटाघाटी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ती दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या आराखड्यांबाबत चर्चा करेल.
काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय असल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळायला कुणी तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर या यातूनच अस्वस्थ होत बोलल्या असतील असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.