वृत्तसंस्था
रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा गोरगरिबांना पैसे वाटतोय असे सांगून एका महिलेला फसवून तिच्या दीड वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार रांचीत घडला आहे. तीन दिवसांपूर्वी हा गुन्हा घडूनही अद्याप झारखंड पोलिसांना कुठलाही सुगावा लागलेला नाही. dhoni is distributing cash group scam women kidnap her 1year old girl
याची कहाणी अशी :
रांची जिल्ह्यातील जगन्नाथपुर येथील रहिवासी मधु देवी आपल्या दोन मुलींबरोबर एका मार्केटमध्ये कपडे खरेदी करत होती. तेथे एका महिलेबरोबर एक बाईकस्वार आला आणि त्या महिलेने मधु देवीला महेंद्रसिंह धोनी गरिबांना पैसे वाटतोय आणि घरे देतो आहे, असे सांगितले. या महिलेच्या जाळ्यात मधु देवी अडकली आणि तिने आपल्या आठ वर्षांच्या मुलीला मार्केटमध्ये खाऊच्या स्टॉलवर सोडले आणि त्या बाईक स्वाराबरोबर पुढे गेली. बाईकस्वराने वीज कार्यालयापाशी गाडी थांबवली आणि त्या महिलेला त्या कार्यालयात धोनीची पैसे वाटण्याची बैठक सुरू असल्याचे सांगितले.
मधु देवीचे लक्ष तिकडे वळल्याबरोबर बाईकस्वार आणिशत्या महिलेने मधु देवीच्या दीड वर्षांच्या मुलीला घेऊन पोबारा केला. मधु देवी हिने नंतर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अद्याप यश आलेले नाही. हा गुन्हा घडून तीन दिवस होऊन गेले, पण अद्याप गुन्हेगार किंवा संबंधित अपहृत मुलीचा पत्ता लागलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App