धर्मेंद्र प्रधान + भूपेंद्र यादव + मुरलीधर मोहोळ यांच्याकडे भाजपच्या तगड्या जबाबदाऱ्या; नेमका अर्थ काय??

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे भाजपने आज दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या राजकीय मुहूर्तावर तगड्या जबाबदाऱ्या सोपविल्या. त्यांच्याकडची केंद्रीय मंत्री पदे काढून घेतलेली नाहीत, त्या उलट या तीनही नेत्यांकडे महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीच्या जबाबदाऱ्या सोपविल्या. त्यामुळे पक्षातले या तीनही नेत्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. Dharmendra Pradhan + Bhupendra Yadav

प्रधान बिहारचे, तर यादव बंगालचे प्रभारी

धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे, तर भूपेंद्र यादव यांच्याकडे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तामिळनाडू विधानसभा निवडणूक सहभागी म्हणून जबाबदारी सोपविली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि केंद्रीय कार्यालय प्रमुख अरुण सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

येत्या तीन महिन्यांमध्ये बिहार विधानसभा निवडणूक होत आहे तिची निकटता लक्षात घेऊन धर्मेंद्र प्रधान यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री सी आर पाटील आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे बिहार सहप्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयंत पांडा यांच्याकडे तामिळनाडू विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्याचबरोबर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार बिप्लव कुमार देव यांच्याकडे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सहभागी म्हणून जबाबदारी सोपविली आहे.



बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या तिन्ही राज्यांमध्ये येत्या वर्षभरात निवडणुका होणार असून ही तिन्ही राज्य भाजपसाठी मोठी आव्हानात्मक राज्ये आहेत. इथली भाजप संघटना मजबूत करून निवडणुकीत सत्ताधार्‍यांसमोर तगडे आव्हान उभे करण्याचे आव्हान या सर्व नेत्यांसमोर असणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवड

पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा आजच्या नियुक्ती त्यांना भाजप अंतर्गत राजकारणातला एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. तो म्हणजे भाजपला आगामी काळात राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवड करायची आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत माध्यमांनी जी अनेक नावे पेरली, त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांची नावे आघाडीवर आहेत. त्यासाठी माध्यमांनी अनेक तर्क सुद्धा दिले आहेत. दोन्ही नेत्यांपैकी कुणालाही राष्ट्रीय अध्यक्ष केले तर भाजपचा कसा फायदा होईल किंवा पक्षाला कोणता तोटा होईल याची वर्णने अनेक माध्यमांनी आतापर्यंत अनेकदा करून झाली आहेत.

दोन्ही नेते शर्यतीतून बाहेर

परंतु धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांच्याकडे महत्त्वपूर्ण राज्य असलेल्या बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रभारी पद सोपवून या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून दूर केल्याचे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मानले जात आहे. कारण बिहारची निवडणूक नोवेंबर मध्ये होणे अपेक्षित आहे, तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणुका 2026 मे महिन्याच्या आत होणे अपेक्षित आहे. याचा अर्थ या निवडणुका होईपर्यंत तरी धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांना अन्य कुठली राजकीय भूमिका मिळण्याची शक्यता नाही किंबहुना भाजप ते देण्याची शक्यता नाही, शिवाय भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवड तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत थांबण्याची शक्यता नाही त्यामुळे धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव हे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर गेल्याचे आजच्या नियुक्त्यांमधून स्पष्ट होताना दिसत आहे.

Dharmendra Pradhan + Bhupendra Yadav out of race of BJP National presidency

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात