महाराष्ट्र पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्थान घातलेल्या ग्राउंड झिरोवर देवेंद्र फडणवीसांची भेट; जवानांचे केले अभिनंदन

प्रतिनिधी

गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेवर चकमकीत महाराष्ट्र पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना घातलेल्या महाराष्ट्राचे सुरुवातीचे गाव असलेल्या दामरंचाच्या गावाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन तेथे जवानांचे अभिनंदन केले आणि त्यांचे मनोधैर्य उंचावले. Devendra Fadnavis’s visit to ground zero where 3 Naxalites were cornered by Maharashtra Police

नक्षलवाद्यांशी जिथे चकमक झाली, त्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील दामरांच्या गावाला फडणवीस यांनी भेट दिली. हे गाव छत्तीसगडच्या सीमेवर आणि महाराष्ट्राच्या सुरुवातीला आहे. इथे महाराष्ट्र पोलिसांनी माओवाद्यांवर फार चांगल्या प्रकारे जरब बसवली आहे. त्यांचे मनोबल वाढवणे माझे कर्तव्य आहे. इथे पोलीस पोलिसांचेच काम नव्हे तर नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे काम पण करतात, अशा शब्दात फडणवीस यांनी पोलिसांचे कौतुक केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले :

  •  नक्षलवाद ही विचारांची नाही, तर आता देशविरोधी लढाई आहे. इतर परकीय शक्ती आणि आयएसआय सारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणार्‍यांची ती लढाई आहे.
  • या नक्षलवादी कारवायांमध्ये सामान्य माणसांचे बळी गेले आहेत. आदिवासी, अनुसूचित जातीच्या लोकांचे बळी गेले आहेत. लोकहिताची, व्यापक विकासाला कायम नक्षल विचारधारेने विरोध केला आहे.
  • आज शहरी नक्षलवादाची सुद्धा मोठी समस्या आहे. पोलिस भरतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांचे ब्रेनवॉश करुन ही लढाई शहरांमध्ये लढू पाहताहेत.
  • लोकशाही आणि संविधान न मानणे, हेच त्यांचे काम आहे. ही अराजकता आहे. गेल्या कालावधीत असेच एक मोठे नेटवर्क ध्वस्त करण्याचे काम आम्ही केले होते.

Devendra Fadnavis’s visit to ground zero where 3 Naxalites were cornered by Maharashtra Police

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात