मिचाँग चक्रीवादळामुळे चेन्नईत विध्वंस; 72 तास वीज गुल, इंटरनेट बंद; हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पोहोचवले अन्न

मिचाँग चक्रीवादळामुळे चेन्नईत विध्वंस; 72 तास वीज गुल, इंटरनेट बंद; हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पोहोचवले अन्न

वृत्तसंस्था

चेन्नई : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उदयास आलेले मिचाँग चक्रीवादळ 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकले. त्याआधी या वादळाने चेन्नईत बराच विध्वंस केला होता. येथे एका दिवसात सर्वाधिक पाऊस 50 सें.मी. Devastation in Chennai due to Cyclone Michong

गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे अनेक भाग पुरात बुडाले आहेत. अनेक भागात ७२ तास वीज नाही. इंटरनेट बंद आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत अन्न पोहोचवले जात आहे.

तामिळनाडूतील वादळामुळे राज्यात 2 दिवसांत 3 महिन्यांचा पाऊस पडला. चेन्नई शहर पाण्यात बुडाले असून त्यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सीएम एमके स्टॅलिन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ५०६० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.

मिचाँग चक्रीवादळ बुधवारी तेलंगणात पोहोचल्याने कमकुवत झाले. दुसरीकडे चक्रीवादळामुळे ओडिशात पाऊस पडत आहे.

Devastation in Chennai due to Cyclone Michong

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात