वृत्तसंस्था
हैदराबाद :Chhattisgarh छत्तीसगडचा मोस्ट वॉन्टेड नक्षली नेता देवा बारसे याने हैदराबादमध्ये आत्मसमर्पण केले आहे. देवा सोबत 20 नक्षलवाद्यांनीही शस्त्रे खाली ठेवली आहेत. हैदराबादमध्ये दुपारी 3 वाजता पोलीस पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील. सहकाऱ्यांसह देवा तेलंगणातील मुलुगु येथे पोहोचला होता, जिथून पोलिसांनी त्याला हैदराबादला आणले.Chhattisgarh
आज (शनिवारी) सकाळी छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 14 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सुकमाच्या किस्टाराम परिसरात 12 आणि विजापूरमध्ये 2 नक्षलवादी मारले गेले आहेत. विजापूरमध्ये ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परिसरात शोधमोहीम सुरू असून दोन्ही बाजूंनी थांबून थांबून गोळीबार सुरू आहे.Chhattisgarh
विजापूरमध्ये माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोहीम सुरू केली. डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) ची टीम नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाली होती. याच दरम्यान शनिवारी पहाटे नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
सकाळी सुमारे ५ वाजल्यापासून माओवाद्यांसोबत थांबून थांबून चकमक सुरू आहे. शोध मोहिमेदरम्यान चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले आहेत. चकमकीची पुष्टी एसपी जितेंद्र यादव यांनी केली आहे.
सुरक्षेच्या कारणांमुळे चकमकीचे नेमके ठिकाण आणि ऑपरेशनमध्ये सहभागी सुरक्षा दलांची संख्या सार्वजनिक करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या मते, ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर माहिती अधिकृतपणे जारी केली जाईल.
नक्षलविरोधी लढ्याला चकमक -शरणागतीने दुहेरी यश
केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत डाव्या विचारसरणीचा अतिरेक संपवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०२५ मध्ये छत्तीसगडमध्ये चकमकींत २८५ नक्षली मारले गेले Â सुकमात मारल्या गेलेल्या नक्षल्यांत कोंटा एरिया कमिटीचा इन्चार्ज वेट्टी मंगडू आणि सेक्रेटरी मडवी हितेश ऊर्फ हुंगाचा समावेश आहे. दोघेही गेल्या वर्षी जूनमध्ये कोंटा भागातील आयईडी स्फोटात सहभागी होते, ज्यात तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) आकाश राव गिरेपुंजे यांचा मृत्यू झाला होता.
तेलंगणात शरण आलेला बडसे सुक्का लष्करी रणनीती, स्फोटके, बंदुका आणि आयईडी बॉम्ब बनवण्यात तरबेज आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App