विशेष प्रतिनिधी
मुंबई :Despite Trump अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून दबाव आणण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या गाड्या वचा वेग कमी झालेला नाही. एप्रिल-जून 2025 तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) तब्बल 7.8 टक्क्यांवर पोहोचला असून, मागील पाच तिमाहीतील हा सर्वोच्च आकडा ठरला आहे.Despite Trump
सेवाक्षेत्रातील प्रचंड उभारीमुळे हा विक्रमी दर साध्य झाला आहे. जानेवारी-मार्च 2025 मधील 7.4 टक्क्यांच्या तुलनेत आणि 2024-25 च्या पहिल्या तिमाहीतील 6.5 टक्क्यांच्या तुलनेत ही झेप अधिकच भक्कम आहे. त्यामुळे भारताने पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा मान राखला आहे.Despite Trump
ट्रम्प यांनी भारताकडून रशियन शस्त्रे व तेल खरेदी सुरू असल्याचे कारण देत ऑगस्ट अखेरीस टॅरिफ दुप्पट करण्याची घोषणा केली होती. मात्र या आव्हानाच्या सावटातही भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती उलट अधिक वेगाने झाली आहे.
यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एप्रिल-जून वाढ केवळ 6.5 टक्क्यांवर मर्यादित राहील, असा अंदाज वर्तविला होता. अनेक अर्थतज्ज्ञांनीही वाढ 7 टक्क्यांच्या आसपासच राहील, अशी अपेक्षा केली होती. पण प्रत्यक्ष आकडेवारीने सर्वांचे अंदाज खोटे ठरवून भारतीय अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्याचा दाखला दिला.
मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी स्पष्ट केले की, अमेरिकन टॅरिफमुळे काही अनिश्चितता असली तरी सरकार चालू आर्थिक वर्षात 6.3 ते 6.8 टक्क्यांचा जीडीपी वाढीचा अंदाज कायम ठेवत आहे.
जागतिक व्यापारयुद्ध, टॅरिफचा धोका आणि भू-राजकीय अस्थिरता यांमध्येही भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ कायम असल्याचे या वाढीने अधोरेखित केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App