प्रतिनिधी
मुंबई : श्रद्धा वालकर तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर देखील आफताब पूनावाला याने गुन्हा अमान्य असल्याचा दावा कोर्टात केला आहे.
आफताबने श्रद्धाची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक उद्योग केले. मृतदेहाच्या काही तुकड्यांपैकी काही तुकडे त्याने ग्राईंडरमध्ये बारीक करून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील आफताब म्हणतो, मला गुन्हा अमान्य आहे!!Despite cutting Shraddha Walker into 35 pieces, Aftab Poonawala’s crime is invalid!!
आफताबने मागच्या वर्षी म्हणजे १८ मे २०२२ ला श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे त्याने दिल्लीच्या महारौलीच्या जंगलात आणि इतर भागांमध्ये फेकले होते. काही तुकडे त्याने ग्राईंडरमध्ये बारीक केले होते आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली.
लव्ह जिहाद : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब आणि त्याच्या परिवारालाही कठोर शिक्षा द्या; श्रद्धाच्या वडिलांचा संताप
पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने स्वतः आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. मात्र आता त्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
नेमके प्रकरण काय?
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाच्या विरोधात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा निश्चित केला आहे. तसेच कलम २०१ अंतर्गत गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचाही आरोप निश्चित केला आहे. दिल्लीतल्या साकेत न्यायालयाने आफताबवर आरोप निश्चित केले. आफताबच्या विरोधात हत्येचा आणि हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट केल्याचा खटला चालणार आहे. अशात आफताबने हे आरोप फेटाळले आहेत आणि मी खटल्याला सामोरे जाईन, असे म्हटले आहे.
न्यायालयाने श्रद्धाचे वडील विकास वालकर यांच्या एका याचिकेला ९ तारखेपर्यंत स्थगिती दिली होती. या याचिकेत विकास वालकर यांनी असं म्हटलं होतं की माझ्या मुलीच्या मृतदेहाचे अवशेष मला द्या. मला त्यावर परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करायचे आहेत. मात्र ९ मेपर्यंत या याचिकेला स्थगिती देण्यात आली आहे. आफताब पूनावालावर पोलिसांनी आयपीसी कलम ३०२ आणि कलम २०१ अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App