माजी व्यवस्थापक रणजित सिंग हत्येप्रकरणी निर्दोष Dera chief Ram Rahim gets big relief from High Court!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला आज हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. खरे तर पंजाब-हरियाणा हायकोर्टाने डेराचे माजी व्यवस्थापक रणजित सिंग यांच्या हत्येप्रकरणी डेरा प्रमुखाची निर्दोष मुक्तता केली. हायकोर्टाने सीबीआय कोर्टाचा निर्णय रद्द करत राम रहीमची हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. या हत्याकांडातून न्यायालयाने राम रहीमसह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुखाला पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने २०२१ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. राम रहीम व्यतिरिक्त न्यायालयाने चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. १० जुलै २००२ रोजी कुरुक्षेत्रातील खानपूर कोलिया येथे रणजित सिंग यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा देण्यात आली होती.
सीबीआय न्यायालयाच्या या निर्णयाला डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मंगळवारी न्यायमूर्ती सुरेश्वर ठाकूर आणि न्यायमूर्ती ललित बत्रा यांच्या समावेश असलेल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. पत्रकाराची हत्या आणि साध्वीवरील बलात्काराच्या प्रकरणातही त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
खरं तर, १० जुलै २००२ रोजी डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असलेल्या कुरुक्षेत्रातील रणजीत सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलीस तपासावर असमाधानी असल्याने रणजित सिंग यांचा मुलगा जगसीर सिंग याने जानेवारी २००३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयपर्यंत पोहोचले. सीबीआयने आपल्या तपासात या प्रकरणात डेरा प्रमुखासह पाच जणांना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App