विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकशाहीच संकटात मार्ग दाखवते ही तुम्ही सांगितलेली गोष्ट मला आजही आठवते. मला युक्रेनमधील मानवी संकटाची खूप काळजी वाटते. भारत युक्रेनची सर्वोतपरी मदत करत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.Democracy shows the way in crisis, PM Modi reminds Joe Biden of previous dialogue
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेनव यांच्यात व्हर्च्युअल संवाद झाला. त्यात दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, कोरोना महामारी, अर्थव्यवस्था, लोकशाही व सुरक्षा आदी विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी बायडेन यांनी 24 मे रोजीच्या क्वाड परिषदेत मोदींना भेटण्याचीही इच्छा व्यक्त केली.
मोदी म्हणाले, युक्रेनमधील स्थिती दिवसागणिक खराब होत असताना आपली चर्चा होत आहे. काही आठवड्यांपूर्वी आम्ही तिथे अडकलेल्या 20 हजार नागरिकांची सुटका केली. त्यात बहुतांश तरुण विद्यार्थी होते. मी युक्रेन व रशियाच्या अध्यक्षांशीही अनेकदा चर्चा केली. मी पुतीन यांनाही थेट युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. आमच्या संसदेतही युक्रेनच्या मुद्यावर खूप चर्चा झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App