नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, काँग्रेसमधील कपिल सिब्बल यांच्यासारखे असंतुष्ट नेते गांधी घराण्याकडून पक्षाची सूत्रे दुसऱ्या नेत्यांकडे देण्याची मागणी करत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांना सोपवण्याची मागणी नव्याने केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याआधीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष बनवण्याचा सल्ला दिला होता, मात्र पहिल्यांदाच पक्षाच्या बैठकीत यावर ठराव करण्यात आला आहे.Demand for Sharad Pawar to become UPA president resurfaced, resolution passed by NCP Youth Congress
वृत्तसंस्था
मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, काँग्रेसमधील कपिल सिब्बल यांच्यासारखे असंतुष्ट नेते गांधी घराण्याकडून पक्षाची सूत्रे दुसऱ्या नेत्यांकडे देण्याची मागणी करत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांना सोपवण्याची मागणी नव्याने केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याआधीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष बनवण्याचा सल्ला दिला होता, मात्र पहिल्यांदाच पक्षाच्या बैठकीत यावर ठराव करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी माध्यमांना सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत शरद पवार यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे जो देशात बंधुभाव पुन्हा प्रस्थापित करू शकेल. शरद पवार हे सर्व प्रादेशिक पक्षांशी तसेच काँग्रेसशी संबंध असलेले व्यक्ती आहेत.
2024च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांना विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करायचे आहे का? या प्रश्नावर पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षांनी कोणत्याही पदाची चर्चा नसून देशाला शरद पवार यांच्या अनुभवाची गरज असल्याचे सांगितले. अनेक पक्ष काँग्रेससोबत नाहीत, शरद पवारांमुळे सगळे एकत्र येऊ शकतात, असा तर्क त्यांनी दिला.
या मागणीला पाठिंबा देताना राष्ट्रवादीचे नेते माजीद मेनन यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस अंतर्गत वादामुळे यूपीएचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत नाही. 2024 साठी वेळ निघून जात आहे, त्यामुळे काँग्रेसने शरद पवारांसारख्या अनुभवी हातांमध्ये यूपीएची सूत्रे सोपवावीत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 2004 पासून यूपीएचे नेतृत्व करत आहेत. 2014 मध्ये सत्तेतून बेदखल झाल्यानंतर आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसमोर सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर गांधी घराण्याच्या विशेषत: राहुल गांधींच्या नेतृत्वावर विरोधी छावणीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ममता बॅनर्जी यांची राष्ट्रीय भूमिका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हेही विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पण काँग्रेस या नेत्यांचे नेतृत्व क्वचितच स्वीकारेल. अशा स्थितीत शरद पवारांना चेहरा बनवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. काही काळापूर्वी शिवसेनेने पवारांच्या नेतृत्वासाठी लॉबिंग केले होते. मात्र, खुद्द पवार यांनीच आतापर्यंत या गोष्टीचा इन्कार केला आहे. राष्ट्रवादीच्या या ताज्या भूमिकेवर काँग्रेस आणि दस्तुरखुद्द पवार यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App