वृत्तसंस्था
दिल्ली: सांगली आणि राज्याच्या इतर भागात आलेल्या पुराच्या परिस्थितीवर केंद्राच्या मदतीसाठी खासदार संजय काका पाटील आणि इतर खासदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असल्याची माहिती संजय काका पाटील यांनी the focus india ला त्यांच्या मुलाखतीत दिली.Delhi:MP Sanjay Kaka Patil will meet the Prime Minister to seek help for the flood victims
त्यांनी सांगितले की राज्यांतील पूर आणि कोरोनाच्या परिस्थितीवर आम्ही केंद्राची मदत मागितली आहे. त्यांनी सांगितले की काही कौटुंबिक कामामुळे त्यांना राज्यात परत जायचं आहे मात्र गुरुवारी ते पुन्हा दिल्लीला येणार असून काही खासदारांसह प्रधानमंत्र्यांना भेटणार आहेत.
सोबतच त्यांनी सांगितलं की पुरामुळे लसीकरणाच्या कामात अडथळे येत असल्याने त्यांच्या क्षेत्रात जास्त लस देण्यात याव्या या मागणीस ते आज केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारती पवार यांना भेटले.तसेच ते बोलले की राज्यात पुरामुळे मोठ्या मदतीची गरज आहे
2019 च्या पुरात देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या भागाला मदत केली होती आता महाआघाडी सरकारच राज्य आहे त्यांनी ही आमची मदत करायला हवी.त्यासाठी आम्ही राज्याला मदत मागितली आहे .
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App