या अगोदर या दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत पाच दिवसांची वाढ केली होती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. याप्रकरणी न्यायालयाने पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ मार्चपर्यंत वाढ केली आहे.Delhi Liquor Policy No relief for Sanjay Singh and Manish Sisodia The court extended the custody again
अखेरच्या सुनावणीत म्हणजेच शनिवारी (२ मार्च) दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने अबकारी धोरण प्रकरणात आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत पाच दिवसांची वाढ केली होती, जी आजच संपत होती.
मागील सुनावणीत कोणी काय युक्तिवाद केला?
ईडीने मागील सुनावणीदरम्यान असा युक्तिवाद केला होता की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका प्रलंबित आहे, तोपर्यंत सिसोदिया यांच्या नियमीत जामीन अर्जावर विचार केला जाऊ नये. सिसोदिया यांच्या वतीने वरिष्ठ वकील मोहित माथूर यांनी सांगितले की, कोळसा घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका प्रलंबित असूनही खटल्याची कार्यवाही सुरूच आहे.
ईडीने यापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी चौकशीसाठी आठ वेळा समन्स पाठवले आहेत. मात्र केजरीवाल हे बेकायदेशीर आणि राजकीय सूडबुद्धीचे कृत्य असल्याचे सांगत केंद्रीय तपास यंत्रणेसमोर एकदाही हजर झाले नाहीत.
अशा परिस्थितीत, ईडीने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १७४ (लोकसेवकाच्या आदेशाची अवज्ञा) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) च्या कलम ६३ (४) आणि इतर कलमांखाली तक्रार दाखल केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App