वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Atishi दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर (LG) विनीत कुमार सक्सेना यांनी सोमवारी मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच मुख्यमंत्र्यांना काम करताना पाहिले. तुमच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे (अरविंद केजरीवाल) एकही विभाग नव्हता, तर तुम्ही अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळत आहात.Atishi
एलजींनी लिहिले की, काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुम्हाला हंगामी आणि तात्पुरते मुख्यमंत्री म्हटले होते. मला हे खूप आक्षेपार्ह वाटतं आणि त्यामुळे मी दुखावलो आहे. हा केवळ तुमचाच नाही तर भारताचे गव्हर्नर म्हणून आणि तुमची नियुक्ती करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून माझाही अपमान आहे.
एलजींनी पत्रात काय लिहिले…
In a letter to Delhi CM Atishi, LG VK Saxena expressed objection to AAP national convenor Arvind Kejriwal calling Atishi a temporary Chief Minister "…I found this very objectionable and I was hurt by it. It was not only an insult to you, but also to your appointee, the… pic.twitter.com/8Gf5gmlso7 — ANI (@ANI) December 30, 2024
In a letter to Delhi CM Atishi, LG VK Saxena expressed objection to AAP national convenor Arvind Kejriwal calling Atishi a temporary Chief Minister
"…I found this very objectionable and I was hurt by it. It was not only an insult to you, but also to your appointee, the… pic.twitter.com/8Gf5gmlso7
— ANI (@ANI) December 30, 2024
आठवडाभरापूर्वी केजरीवाल यांना पत्र लिहिले होते
सुमारे एक आठवड्यापूर्वी, 22 डिसेंबर रोजी एलजींनी दिल्लीतील अनेक भागातील अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ शेअर केला होता.
दुसऱ्या दिवशी, आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये भागात स्वच्छतेचे काम सुरू झाल्याची माहिती दिली होती. याचाच समाचार घेत एलजी यांनी केजरीवाल यांना पत्र लिहिले होते.
किरारी, संगम विहार, मुंडका यांसारख्या भागातही ही तत्परता दाखवली असती तर बरे झाले असते, असे एलजींनी लिहिले होते. ज्या शाळांमध्ये दोन वर्गांची मुले एकाच खोलीत बसतात त्या शाळांकडेही लक्ष दिले असते, तर मला आनंद झाला असता. मोहल्ला क्लिनिकची व्यवस्थाही सुधारली असती. गेल्या अडीच वर्षात मी तुम्हाला दिल्लीतील जनतेच्या समस्या अनेकदा सांगितल्या, पण आजपर्यंत त्यावर कोणतेही काम झालेले नाही.
यमुनेतील वाढत्या प्रदूषणावर एलजींनी लिहिले की, यासाठी मी तुम्हाला जबाबदार धरेन, कारण तुम्हीच यमुनेच्या स्वच्छतेचे काम थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतः रस्त्यावर या आणि परिस्थितीचा आढावा घ्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App