विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजप स्वत:ला देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो, मात्र छोट्या आम आदमी पक्षाच्या भीतीने महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने दिल्लीत वेळेवर निवडणुका घेऊन विजय मिळवला तर मी राजकारण करणे थांबवेन. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मीडियासमोर हे वक्तव्य केले. Delhi government forgets Sukhdev, Rajguru BJP opposition leader’s objection
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून बाहेर पडल्यानंतर ते बोलत होते. दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या अभिभाषणानंतर याची सुरुवात झाली. भाषणानंतर भाजपच्या नेत्यांनी विधानसभेत गदारोळ केला.
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल आदी उपस्थित होते.
उपराज्यपालांच्या अभिभाषणानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक संपला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते रामबीर सिंह बिधुरी यांनी सुखदेव आणि राजगुरू यांचेही स्मरण करण्याची विनंती केली. केजरीवाल म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांचा आक्षेप रास्त आहे. मी चूक मान्य करतो. पुढच्या वेळेपासून शहीद भगतसिंग यांच्यासह सुखदेव, राजगुरू यांचेही चित्रे दिल्ली सरकारच्या जाहिरातींमध्ये दाखवण्यात येणार असल्याचे केजरीवाल सांगितले.
केजरीवाल म्हणाले की, शहीद भगतसिंग यांची स्वप्ने आजपर्यंत पूर्ण झाली नाहीत. प्रत्येक पक्षाने घाणेरडे राजकारण केले, देशात पहिल्यांदाच आम आदमी पक्षाचे प्रामाणिक सरकार स्थापन झाले. पंजाबमध्येही आमच्या पक्षाचे सरकार स्थापन झाले. भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शपथ घेतली. दिल्ली आणि पंजाबमधील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये भगतसिंग यांचे चित्र लावण्यात येणार आहे. भाजप सरकारनेही त्यांचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत.
गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल, उपराज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आदी उपस्थित होते. स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्यासह अनेक मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि विधानसभेत दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App