वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणामुळे कथित दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात ईडीने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, विजय नायर यांनी अरुण पिल्लई, अभिषेक बोईनापल्ली आणि बुची बाबू यांच्यासोबत झूम कॉलची व्यवस्था केली होती. त्यात असे म्हटले आहे की, विजय नायर हे आम आदमी पक्षाचे (आप) महत्त्वाचे सदस्य होते आणि अबकारी धोरणाचे व्यवस्थापन करत होते. Delhi Excise Policy is basically Kejriwal’s own plan, ED reveals in supplementary charge sheet
अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्रात दिल्लीचे नवीन उत्पादन शुल्क धोरण केजरीवाल यांची (ब्रेन चाइल्ड) योजना असल्याचे म्हटले आहे. यासोबतच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीचा कविता यांचाही आरोपपत्रात उल्लेख आहे. के. कविता यांनी उत्पादन शुल्क धोरण तयार केल्यानंतर आणि त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर विजय नायर यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
जाणून घ्या आरोपपत्रात कोणते खुलासे झाले?
ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, मागुंता श्रीनिवास रेड्डी यांनी आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतही भेट घेतली होती. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाचा भाग झाल्याबद्दल केजरीवाल यांनी मागुंता श्रीनिवास रेड्डी यांचे स्वागत केले होते.
अबकारी धोरण तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि बेकायदेशीर कामांसाठी विजय नायर यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा पाठिंबा होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
ईडीच्या या पुरवणी आरोपपत्रात अरुण पिल्लईचा सहकारी अभिषेक बोईनापल्ली हा बुकीबाबू असल्याचे म्हटले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्रात आरोप केला आहे की विजय नायरने समीर महेंद्रूला सांगितले होते की अरुण आणि त्याचा सहयोगी गट दिल्ली दारू धोरणात गुंतवणूक करण्यास इच्छुक होते, कारण या गटाकडे भरपूर पैसा, राजकीय संबंध आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी मैत्री होती.
ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, समीर महेंद्रू यांनी अरविंद केजरीवाल यांना विजय नायर यांची विश्वासार्हता तपासण्यासाठी बैठक घेण्यास सांगितले होते. त्यानंतर विजय नायर यांनी समीर महेंद्रू आणि केजरीवाल यांच्यात फेसटाइम भेटीची व्यवस्था केली.
दिल्ली दारू घोटाळ्याच्या सुरुवातीला त्यांनी राज्यसभा खासदार संजय सिंह यांची भेट घेतल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतर ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या संपर्कात आले आणि आम आदमी पक्षात सामील झाले.
ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, दिनेश अरोरा यांनी संजय सिंहच्या सांगण्यावरून दिल्लीतील अनेक रेस्टॉरंटच्या मालकाकडून 82 लाख रुपयांची व्यवस्था केली आणि मनीष सिसोदिया यांना पक्ष निधीसाठी दिले. ज्याचा वापर दिल्लीच्या निवडणुकीत झाला.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी 5-6 वेळा बोलले होते आणि एकदा संजय सिंह यांच्या निवासस्थानी केजरीवाल यांची भेटही घेतली होती, असे दिनेश अरोरा यांनी सांगितले, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App