Delhi excise case : मनीष सिसोदियांना न्यायालयाकडून मोठा झटका! न्यायालयीन कोठडीत केली वाढ

न्यायालयाने सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या वकीलास आरोपपत्राची ई-प्रत देण्याचे निर्देश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मोठा झटका बसला आहे. कारण, त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. Delhi excise case Court extends Manish Sisodias judicial custody till May 12

सीबीआयच्या एफआयआर प्रकरणी सिसोदिया यांना गुरुवारी राउस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. येथे सीबीआयने सांगितले की, या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यावर, सिसोदिया यांच्या वतीने सांगण्यात आले की, आतापर्यंत आम्हाला आरोपपत्राची डुप्लिकेट प्रत मिळालेली नाही. त्याची प्रत मिळवण्याचा आम्हाला अधिकार आहे. यावर राउस एव्हेन्यू कोर्टाने सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या वकीलास आरोपपत्राची ई-प्रत देण्याचे निर्देश दिले. याशिवाय न्यायालयाने सीबीआयचे म्हणणे रेकॉर्डवर घेतले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ मे रोजी ठेवली आहे.

ईडी प्रकरणाचा निकाल आज येणार –

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ईडी प्रकरणात दिलासा मिळू शकला नाही. त्याच्या जामीन अर्जावरील निर्णय आज (२८ एप्रिल)पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. १८ एप्रिल रोजी जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. ईडी त्यांच्या जामिनावर निर्णय घेणार आहे.

Delhi excise case Court extends Manish Sisodias judicial custody till May 12

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात