JUST DIAL : भयंकर ! दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी विचारला ‘स्पा’चा नंबर-जस्ट डायलने दिली 150 कॉलगर्ल्सची ‘रेट लिस्ट’

  • वाचा स्वाती मालिवाल यांना नेमका काय अनुभव आला आहे?

  • जस्ट डायलवर तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असते म्हणजे मेडिकल नंबर, रूग्णालयं, पोलीस स्टेशन आदी आवश्यक नंबर्स मिळतात.

  • दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना जस्ट डायलचा आलेला अनुभव मात्र भयावह आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जस्ट डायल अवैध धंदे करण्याचे ठिकाण बनत आहे. याचा पुरावा दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Delhi Commission for Women) स्वाती मालीवाल यांच्यासोबत घडलेल्या घटनेत समोर आला आहे. त्याच्यासोबत घडलेली ही घटना केवळ वाईट घटना नाही, तर आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. वास्तविक स्वाती मालीवाल यांना जस्टडायलवर स्पा मसाजसाठी माहिती मिळवायची होती, त्यानंतर त्यांना 150हून अधिक कॉलगर्ल्सचे दर सांगण्यात आले. Delhi Commission for Women sends notice to JustDial for helping ‘sex rackets’

काय म्हटलं आहे स्वाती मालीवाल यांनी?

आम्ही जस्ट डायलवर फोन करुन स्पा मसाजची खोटी चौकशी केली. त्यानंतर आम्हाला 50 मेसेज आले, ज्याद्वारे आम्हाला 150 पेक्षा अधिक मुलींचे दर सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलीस गुन्हे शाखेला समन्स बजावत आहे. या धंद्याला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय? असा प्रश्न स्वाती मालीवाल यांनी विचारला आहे. मालीवाल यांनी या ट्विटमध्ये या मेसेजेसचा स्क्रिनशॉटही पोस्ट केला आहे.

दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी जस्ट डायल या साईटवरुन स्पा मसाजबद्दल खोटी चौकशी केली. त्यानंतर त्यांना 150 हून अधिक मुलींचे ‘रेट्स’ सांगणारे मेसेजेस आले. त्यासोबत या मुलींचे फोटोही पाठवण्यात आले होते. मालीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली आहे.

दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करायची आहे. त्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे. जस्ट डायल स्वतः या प्रकरणात एक पक्ष आहे. मी शक्य आहे ती सर्व कारवाई करणार आहे. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेतलं जाणार नाही असंही दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान दिल्लीत स्पा आणि मसाज सेंटर यांच्या नावाखाली अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस या ठिकाणी वेळोवेळी छापे टाकतात.

Delhi Commission for Women sends notice to JustDial for helping ‘sex rackets’

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात