वृत्तसंस्था
डेहराडून : डेहराडून आणि मसुरीला पर्यटन आणि मौजमजेसाठी खोटे कोरोना अहवाल घेऊन जाणे १३ पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी १०० जणांना बनावट कोरोना अहवाल प्रकरणी पोलिसांनी पकडले आहेत. Dehradun-Mussoorie tourism falls expensive with fake corona negative report; 13 tourists arrested
कोरोनाची दुसरी लाट देशात ओसरत आहे. त्यामुळे पहाडी राज्यात पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. उत्तराखंडमध्ये वाढलेली पर्यटकांची संख्या पाहता राज्य सरकारने कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केला आहे. परंतु, त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे. पर्यटनाची हौस पूर्ण करण्यासाठी खोटे रिपोर्ट घेऊन येत आहेत. राज्यात गुरुवारी अशा १३ पर्यटकांना पकडले आहे. त्यांच्याविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
दोन मोटारीत आढळले १३ जण
राज्यात कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य केल्यानंतर विशेष पथकांद्वारे पर्यटकांची तपासणी केली जात आहे. अशाच एका तपासणीत दोन मोटारीतील १३ जणांकडे खोटे रिपोर्ट आढळून आले. त्यामध्ये एक वाहन गाझीयाबादचे होते. त्यात १० जण तर दुसरे वाहन बिहारचे होते. त्यात ३ जण होते.अशा १३ जणांना पोलिसांनी अटक केली.
आतापर्यंत १०० अहवाल बनावट
पोलिसांना आतापर्यंत पोलिसांनी १०० खोटे अहवाल ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात १०० जणांना पकडले आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पर्यटकांच्या येण्या- जाण्यावर सूट दिली होती. त्याचा परिणाम नैनिताल आणि मसुरी येथे गर्दी वाढण्यावर झाला. कोरोना कॅर्फ्यु २० जुलैपर्यंत वाढविला असला तरी आर्थिक व्यवहाराला चलना देण्यासाठी ननियमात सरकारने नियमांत सूट दिली होती. दरम्यान, रिपोर्ट आणि हॉटेल बुकिंग नसल्याच्या कारणावरून सुमारे ४ हजार पर्यटकांच्या वाहनांना नैनिताल आणि मसुरी येथून परत पाठविण्यात आले आहे.
हिल स्टेशनबाबत पंतप्रधान मोदींना चिंता
पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी पूर्वोत्तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. तेव्हा ते म्हणाले, तिसरी लाट येण्यापूर्वी काही लोक मौजमजा करण्यास इच्छुक आहेत. पण लाट आपोआप येणारी नाही. ती रोखण्यासाठी कोणत्या उपय योजनांची गरज आहे, हे लोकांनी समजून घेतल पाहिजे. नियमांचे पालन आवश्यक आहे. कोरोना आपोआप येणार नाही. त्याला घेऊन येणारे आपणच आहोत. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे. त्यानेच कोरोनावर अंकुश आणता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App