दीपिकाची भगवी बिकिनी, दानिश अलींचे भगवे जॅकेट; शाहरुखच्या ‘पठाण’ समर्थनाचे नवे रॅकेट!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शाहरुख खानच्या पठाण सिनेमावर बहिष्काराचे सावट पडले काय आणि भारतातले सगळे लिबरल अस्वस्थ झाले. दीपिकाने भगवी बिकिनी घालून शाहरुख बरोबर बेशरम गाण्यावर पठाण मध्ये उत्तान डान्स केला, तो या लिबरल्सना भावला. पण पठाण सिनेमावर बहिष्काराची बात होताच सगळे लिबरल्स अस्वस्थ झाले आणि भगव्या रंगाचा वाद सुरू झाला. Deepaka and BSP MP Danish Ali in saffron; both supports Shahrukh Khan’s Patthan

पठाण सिनेमावर बहिष्काराचे सावट गडद होताच संसदेतही त्याचे पडसाद उमटले आणि उत्तर प्रदेशातल्या अमरोहाचे बहुजन समाज पक्षाचे खासदार कुंवर दानिश अली भगवे जॅकेट घालून लोकसभेत आले होते. त्यांनी पठाण सिनेमाचे वेगळेच समर्थन केले. पठाण सिनेमाची नायिका दीपिका पदुकोन ही जेव्हा कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप ट्रॉफीच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला पोहोचली तेव्हा आमचा उर अभिमानाने गदगद भरून आला, असे दानिश अली लोकसभेत भगवे जॅकेट घालून म्हणाले.

त्याचवेळी त्यांनी आजकाल नवीनच फॅशन आली आहे. कोणी कोणत्या रंगाचे कपडे घातले त्यावरून सगळ्या सिनेमावरच बंदी घाला, अशी मागणी सत्ताधारी पक्षाचेच नेते करू लागले आहेत. त्यांच्या मागणीवरूनच सिनेमावर बंदी घालायची तर सेन्सॉर बोर्ड बनवले तरी कशासाठी?? सिनेमावर बंदी घालायची का नाही ते सेन्सॉर बोर्डाला ठरवू द्या, अशी मखलाशी कुंवर दानिश अली यांनी भगवे जॅकेट घालून केली.

पठाण वरच्या बहिष्काराच्या सावटामुळे ते प्रचंड अस्वस्थ झालेले दिसले आणि त्यांनी सनातन धर्म एवढा कमजोर नाही की कोणी कुठले भगवे कपडे घातले म्हणून सनातन धर्माला धोका पोहोचेल आणि मग मधूनच त्यांनी एका मौलवीचा हवाला देत इस्लामही एवढा कमकुवत नाही की एखाद्या मौलवीने सिनेमावर बंदी घालायची मागणी केल्याने इस्लाम कमकुवत होईल, असे कुंवर दानिश अली म्हणाले. पण त्यांच्या सगळ्या भाषणातून पठाण सिनेमावरच्या बहिष्काराचे सावटाची भीतीच गडद झालेली दिसून आली.

Deepaka and BSP MP Danish Ali in saffron; both supports Shahrukh Khan’s Patthan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात