प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी

विशेष प्रतिनिधी

कोलकता – पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला केंद्राकडून आदर्श घेत इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याचे आवाहन केले. दरम्यान, तृणमूलने केंद्राने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करणे, ही केवळ धूळफेक असल्याचा टोला लगावला.Decrease VAT on oil says BJP to TMC

पश्चिम बंगालमधील विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी यासंदर्भात ट्विट केले. ते म्हणाले, की केंद्र सरकारने इंधन स्वस्त करून नागरिकांना दिवाळी भेट दिली. आता, राज्य सरकारनेही इंधनावरील राज्यांचे कर कमी करून ते आणखी स्वस्त करावे.



भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनीही इंधनावरील कर कमी करणे हे लोकहिताचा दावा करणाऱ्या तृणमूल सरकारचे काम असल्याचे ट्विट केले. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांनीही हीच मागणी केली.

दरम्यान, केंद्राने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करून धूळफेक केल्याचा दावा तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष यांनी केला. ते म्हणाले, की इंधनाचे भाव गगनाला भिडल्यानंतर किरकोळ कपात करण्यात आली. केंद्राने इंधनाच्या किंमतीतील मुख्य घटकाची किंमत कमी करावी.

Decrease VAT on oil says BJP to TMC

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात