मोरवी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 132 वर; 170 जणांचा वाचविण्यात यश

वृत्तसंस्था

अहमदाबाद : गुजरातमधील मोरबीत रविवारी झुलता पूल कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 132 वर पोहोचली आहे, पण त्याचवेळी 170 जणांचे प्राण वाचविण्यात यश देखील आले आहे. एनडीआरएफ, नौदल हवाई दल तसेच स्थानिक अग्निशमन दल असे 200 कर्मचारी मदत आणि बचाव कार्य करीत आहेत, अशी माहिती गुजरातची गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनी दिली आहे. Death toll in Morvi bridge disaster rises to 132

शेकडो लोकांचे मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेपूर्वी पुलावर तरुणांची हुल्लडबाजी सुरू असल्याचे समजते. पण आता बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पाटील यांनी घटनास्थळावर प्रत्यक्ष करून पाहणी केली त्याचबरोबर स्थानिक रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची चौकशी देखील केली.

माच्छू नदीवर बनवण्यात आलेला हा झुलता पाच दिवसांपूर्वीच नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. संध्याकाळी 7 च्या सुमारास ह दुर्घटना घडली. दुर्घटना घडली त्यावेळी 500 हून अधिक नागरिक उपस्थित होते. सर्व जण छट पूजा (Chhath) साजरी करण्यासाठी आले होते.  यामध्ये महिला आणि लहान मुलांचा सहभाग अधिक होता. आतापर्यंत 170 हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.

वायुसेनेच्या जवानांना बचावकार्यासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच गुजरात सरकारने मदतीसाठी 02822-243300 हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. मोरबी येथील स्थानिक आमदार बृजेश मेरजा म्हणाले, आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे.

दुर्घटनेनंतर नौदलाच्या 50 कर्मचाऱ्यांसह NDRF, हवाई दलाच्या जवानांना रेस्क्यू ऑपरेशनकरता पाठवण्यात आले आहे. तसेच राजकोट सिव्हिल रुग्णलयात एक आयसोलेशन वॉर्ड बनवण्यात आला आहे. मोरबी येथील हा झुलता पुल हा महापालिकेच्या परवानगीशिवाय सुरू करण्यात आला होता. पैसे कमवण्याच्या हेतूने हा पूल सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. या पूलावर जाण्यसाठी नागरिकांना 17 रुपये तर लहान मुलांना 12 रुपये तिकिट आकारण्यात आले होते.

 

 

पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबांना पीएमएनआरएफ (PMNRF) निधीतून दोन लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरतचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Death toll in Morvi bridge disaster rises to 132

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात