प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकीचा मेल मुंबईतील क्राईम ब्रँचच्या कार्यालयाला आल्याची माहिती गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिली आहे. या धमकीच्या मेलचा सोर्स आणि त्यातील तपशिलाचा अधिक तपास करण्यात येत आहे.Death threat to PM Narendra Modi; E-mail to Mumbai branch of “NIA
काय आहे मेलमध्ये…
राष्ट्रीय तपास संस्थेला (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) यासंदर्भात मेल आला असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर, या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत आहे, असेही ईमेल करणाऱ्याने म्हटले आहे. या ईमेलनुसार, हल्ल्याची योजना तयार करण्यात आली असून ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे,
त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे मेलमध्ये म्हटले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने हा धमकीचा ई-मेल गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनाही पाठवला आहे. ज्या मेल आयडीवरून हा मेल आला, त्याची बारकाईने तपासणी सुरू आहे. हा ईमेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेला आला आहे.
नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे एकूण 20 किलो आरडीएक्स आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर सेलकडून 20 किलो आरडीएक्सच्या सहाय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात होता. पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कटासंदर्भातील ई-मेलचा स्रोत काय? याची माहिती संरक्षण संस्था मिळवत आहेत. तसेच, या नापाक इराद्याने दहशतवादी संघटनांनी 20 स्लीपर सेल तयार केल्याचेही, संस्थांचे म्हणणे आहे.
यापूर्वीही मिळाली होती धमकी
पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी ही पहिल्यांदाच मिळाली नाही तर सप्टेंबर 2021 मध्ये धमकी मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी ट्विटरवरुन मिळाली होती. दीपक शर्मा नावाच्या ट्विटर खात्यावरुन धमकी देण्यात आली होती. याशिवाय जून 2021 मध्ये 22 वर्षीय तरुणाने पोलिसांना फोन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही सांगितले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App