वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मेटाने आपल्या फेसबुक वापरकर्त्यांना डेटा चोरीचा इशारा दिला आहे. मेटाने नोंदवले की, अँड्रॉइड आणि आयओएसवरील अनेक अॅप्सनी त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल चोरून त्यांचा गैरवापर केला. सुमारे दहा लाख फेसबुक युजर्सचे लॉगिन क्रेडेन्शियल्स चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले आहे.Data of 10 lakh Facebook users stolen Meta says 400 apps misused users’ login credentials
फोटो एडिटर, गेम्स, व्हीपीएन सेवा, बिझनेस आणि युटिलिटी अॅप्समध्ये बहुतेक अशा त्रुटी आढळल्या आहेत.
400 अॅप्सकडून डेटाची चोरी
मेटाने गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर अशा 400 अॅप्सचा शोध लावला असून वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा विचार केला आहे. हे अॅप वापरणाऱ्या युजर्सची फेसबुक क्रेडेन्शियल्स चोरून त्यांचा चुकीच्या कामांसाठी वापर केला जात होता.
मेटाने सोशल मीडियावर शेअर केली माहिती
मेटाचे अधिकारी डेव्हिड अॅग्रॅनोविच आणि मालवेअर अभियंता रायन व्हिक्टरी यांनी सांगितले की, त्यांनी या दुर्भावनापूर्ण अॅप्सची माहिती अॅपल आणि गुगलसोबत शेअर केली आहे. ही माहितीही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्रुटीची माहिती मिळताच गुगल आणि अॅपलने हे अॅप्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले.
नवीन अॅपवर लॉगिन क्रेडेन्शियल एंटर करू नका
मेटाने डेटा चोरीच्या प्रकरणावर प्रकाश टाकून वापरकर्त्यांसाठी सुरक्षा उपायदेखील जारी केले आहेत. वापरकर्त्यांनी कोणतेही नवीन अॅप डाउनलोड केल्यानंतर लक्षात ठेवा की ते तुम्हाला वापरकर्ता क्रेडेन्शियल विचारत नाहीत. अशा अॅप्सचा वापर करताना काळजी घ्यावी लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App