वृत्तसंस्था
मुंबई : Dashavatar कोकणच्या मातीतील कला आणि संस्कृतीचा वारसा सांगणारा ‘दशावतार’ चित्रपटाने ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत धडक दिली आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या ‘Main Open Film Category – Contention List’ मध्ये या चित्रपटाची निवड झाली असून, ही कामगिरी करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. या यशामुळे केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाचे वातावरण आहे.Dashavatar
हजारो आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून निवडल्या गेलेल्या 150 हून अधिक चित्रपटांच्या यादीत ‘दशावतार’ हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, Academy Screening Room मध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. कोकणातील दशावतार ही लोककला आणि त्यामागील कलाकारांचे आयुष्य याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी यात ‘बाबुली मेस्त्री’ या दशावतार कलाकाराची अजरामर भूमिका साकारली आहे.Dashavatar
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांची भावूक पोस्ट
चित्रपटाची ऑस्करवारी निश्चित झाल्याचा अधिकृत मेल प्राप्त होताच दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, “कष्टांचं, प्रामाणिकपणाचं, मोठं स्वप्नं पाहण्याचं चीज होतंच… फक्त कामावर विश्वास हवा, खाली मान घालून कष्ट करत राहण्याची चिकाटी हवी, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द हवी आणि विश्वास ठेवणाऱ्या माणसांची खंबीर साथ हवी”
“आज ‘दशावतार’ ऑस्करच्या म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत (Main open film category – contention list) निवडला गेल्याचा मेल आला आणि गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याची दखल घेतली गेल्याचं समाधान मिळालं. हे समाधान फक्त ‘दशावतार’ निवडला गेलाय म्हणून नाहीये, तर आपला मराठी चित्रपट जागतिक स्तरावर तोडीस तोड उभा राहू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय म्हणून आहे.”
सुबोध खानोलकरांनी पुढे लिहिलंय, “जिंकणं हरणं नंतरची गोष्ट, पण मुख्य जागतिक प्रवाहात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणं हे प्रचंड अभिमानास्पद आहे! ही फक्त सुरवात आहे, आम्ही सातत्याने चांगलं काहितरी तयार करण्याचा आणि ते जगासमोर आणून मराठीची मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू! प्रेम आणि आशीर्वाद असू द्या!”
चित्रपटात कलाकारांची तगडी फौज
दशावतार या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर, रवी काळे आणि विजय केंकरे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सिनेमात मोलाचे योगदान दिले आहे. या सिनेमाने जवळपास २८ कोटींची दणदणीत कमाई केली असून मराठीसोबतच तो मल्याळम भाषेतही प्रदर्शित झाला होता.
मराठी सिनेसृष्टीसाठी प्रेरणादायी टप्पा
यापूर्वी अनेक मराठी चित्रपट ऑस्करच्या परदेशी भाषा गटात (Foreign Language Category) भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवले गेले आहेत. मात्र, ‘मेन ओपन फिल्म कॅटेगरी’मध्ये स्थान मिळवून जागतिक चित्रपटांशी थेट स्पर्धा करणे, ही बाब अत्यंत दुर्मिळ मानली जाते. ‘दशावतार’ने हा टप्पा पार करून भविष्यातील मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी नवे दालन खुले केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App