लवासा लेक सिटीत डार्विन ग्रुप उभारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अतिभव्य पुतळा!!


प्रतिनिधी

पुणे : पुणे जिल्ह्यातील पहिले खासगी हिल स्टेशन लवासा लेक सिटीत डार्विन ग्रुप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिभव्य पुतळा उभारणार आहे. जगातील सर्वात मोठा हा पुतळा असणार आहे. Darwin Group will erect a magnificent statue of Prime Minister Narendra Modi in Lavasa Lake City

पुणे शहराजवळ लवासा या ठिकाणी देशातील पहिले खासगी हिल स्टेशन उभारले गेले आहे. मात्र हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आता या लवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याची उंची जवळपास 190-200 मीटर असणार आहे. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ही कंपनी नरेंद्र मोदी यांचा अतिभव्य पुतळा उभारणार आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत या पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

अजित गुलाबचंद यांच्या हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीला लवासा लेक सिटी उभारण्यासाठी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या कारकिर्दीत लवासा नियमबाह्य मंजुरी देण्याचे काम झाल्याचा आरोप अनेकांनी केला होता. त्या आरोपांना मुंबई हायकोर्टाने देखील दुजोरा दिला होता. केवळ लवासा प्रकल्पातील बांधकामे खूप पुढे गेल्यामुळे ती पाडण्याचे निर्देश देता येत नाहीत अन्यथा ती बेकायदा बांधकामे पाडायलाच पाहिजे होती, असे परखड निरीक्षणही मुंबई हायकोर्टाने नोंदविले होते. त्यासंदर्भात नाशिकचे एडवोकेट नानासाहेब शिंदे यांची केस सुप्रीम कोर्टात आजही सुरू आहे.

डार्विन ग्रुपची लवासा खरेदी

या पार्श्वभूमीवर मुंबईतील डार्विन ग्रुपचा लवासा खरेदी करण्याच्या प्रस्ताव राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने (एनसीएलटी) मान्य केला. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा हा देशातील पहिला खासगी हिल स्टेशन प्रकल्प आहे. हा प्रकल्प 1,814 कोटी रुपयांमध्ये ही डार्विन ग्रुपने खरेदी केला. या ठिकाणी डार्विन ग्रुप नरेंद्र मोदी यांचा पुतळा उभारणार आहे. पुतळा उद्घाटनाच्या कार्यक्रमात जर्मनी, इस्त्रायल, फ्रांस, संयुक्त अरब अमीरात आणि अमेरिकचे राजदूतांचा सहभाग असेल, अशी माहितीही मिळाली आहे.

भरपाई देणार

डार्विन कंपनी लवासा प्रकल्पासाठी आठ वर्षात १ हजार ८१४ कोटी रुपये देणार आहे. बँकांची ९२९ कोटी तर घर खरेदी करणाऱ्यांची ४३८ कोटींची भरपाई या कंपनीकडून देण्यात येणार आहे. एकूण १२ हजार ५०० एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. अजित गुलाबचंद यांच्या हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचा हा प्रकल्प दिवाळखोरीत गेल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. परंतु आता डार्विन कंपनीने हा प्रकल्प विकत घेतल्यामुळे त्यांचे काम सुरू होणार असून लवासामध्ये आता नरेंद्र मोदींचा भव्य पुतळा उभा राहणार आहे.

Darwin Group will erect a magnificent statue of Prime Minister Narendra Modi in Lavasa Lake City

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात