पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्जविरुद्धच्या लढाईला नवीन बळ मिळाले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सांगितले की, डार्क वेब, क्रिप्टोकरन्सी आणि ड्रोन हे देशासाठी एक आव्हान आहे आणि त्यांच्याबाबत कठोर पावले उचलावी लागतील. ‘ड्रग्ज तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद भूषवताना, शाह म्हणाले की, देशाच्या आत किंवा बाहेर कोणत्याही प्रकारची ड्रग्ज तस्करी होवू दिली जाणार नाही.Amit Shah
सरकारने अनेक ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यात यश मिळवले आहेच, परंतु त्यांच्याशी संबंधित दहशतवादही नष्ट केला आहे. ते म्हणाले की जम्मू आणि काश्मीर, पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये नार्को-दहशतवादाची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत आणि ही मोठी कामगिरी आहे. ते म्हणाले, “डार्क वेब, क्रिप्टोकरन्सी, ऑनलाइन मार्केटप्लेस, ड्रोनचा वापर अजूनही आपल्यासाठी एक आव्हान आहे.”
‘डार्क वेब’ म्हणजे इंटरनेटचा तो गुप्त भाग जो केवळ विशेष सॉफ्टवेअर आणि साधनांद्वारेच वापरता येतो. ‘क्रिप्टोकरन्सी’ ही एक आभासी चलन आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी, राज्य आणि केंद्र सरकार आणि तंत्रज्ञांच्या संयुक्त प्रयत्नातून या समस्यांवर तांत्रिक उपाय शोधले पाहिजेत, असे शाह म्हणाले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्जविरुद्धच्या लढाईला नवीन बळ मिळाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App