चीनच्या खेळाडूला हरवून केली कामगिरी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : D Gukesh भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने जगज्जेते होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्याने गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या 11व्या फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना त्याने ही कामगिरी केली. ही 14 फेऱ्यांची स्पर्धा शास्त्रीय स्वरुपात खेळवली जात असून, त्यात आता फक्त तीन खेळ शिल्लक आहेत. विजयानंतर डी गुकेशचे 6 गुण झाले आहेत. तर चीनच्या खेळाडूचे पाच गुण आहेत. जो खेळाडू प्रथम 7.5 गुण मिळवेल तो जागतिक चॅम्पियनशिपचा विजेता होईल.D Gukesh
डिंग लिरेन वेळेच्या दबावाखाली होता. या दडपणाखाली चीनच्या खेळाडूने चुका केल्या, ज्याचा फायदा घेत गुकेशने स्पर्धेतील दुसरा विजय संपादन केला. सलग सात ड्रॉ आणि एकूण आठ ड्रॉनंतर गुकेशचा विजय झाला आहे. चीनच्या खेळाडूकडे फक्त सात मिनिटे शिल्लक असताना त्याने 28व्या चालीत मोठी चूक केली आणि लगेचच पराभव स्वीकारला. पण लिरेनची सुरुवात चांगली झाली नाही, असे बुद्धिबळ तज्ज्ञांचे मत आहे.
डी गुकेशला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी आता फक्त तीन ड्रॉची गरज आहे. लिरेनने सुरुवातीचा गेम जिंकून या स्पर्धेत आघाडी घेतली मात्र गुकेशने तिसरा गेम जिंकून सामना बरोबरीत आणला. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये सलग सात गेम अनिर्णित राहिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App