वृत्तसंस्था
लॉस एंजलिस : ऑस्कर पुरस्कार 2023 सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘चल्लो शो’, ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर साठी नामांकन मिळाले आहे. त्यामुळे भारतीय लोक आतुरतेने ऑस्कर सोहळ्याची वाट पाहत आहेत. पण अजून एक कारण सोहळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी सामील होत आहे, ते म्हणजे दीपिका पदुकोण ही अभिनेत्री देखील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात झळकणार आहे. आज सकाळीच तिने ही बातमी इंस्टाग्रामवर आपल्या चाहतांसमवेत शेअर करत आनंद व्यक्त केला. Curious about Deepika’s glamorous entry at the Oscars!!
ऑस्कर पुरस्कार सोहळा येत्या 12 मार्च रोजी रंगणार आहे. तर 13 मार्च रोजी सकाळी 5:30 वाजता हा सोहळा भारतीयांना बघता येणार आहे. सिनेजगात सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका पुरस्कार जाहीर करताना दिसणार आहे. तिच्याच सोबत पुरस्कार जाहीर करणाऱ्यांची नावे तिने पोस्टमध्ये शेअर केली आहेत. रिझ अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोझ, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅम्युअल एल जॅक्सन, ड्वेन जॉन्सन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, दीपिका पदुकोण, क्वेस्टलव, झो सलदाना आणि डोनी येन हे कलाकार यंदाच्या सोहळ्यात ऑस्कर पुरस्कार जाहीर करताना दिसणार आहेत.
अभिनेत्री दीपिका पदुकोण या सोहळ्यात दिसणार असल्यामुळे चहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. तिने हि बातमी सकाळी इन्स्टा वर पोस्ट केल्यानंतर चहत्यांचा त्या पोस्टवर भरपूर प्रतिसाद दिला. दीपिकाचा पती आणि सुप्रसिद्ध एक्टर रणवीर सिंग यानी देखील तिच्या पोस्टवर कंमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. इतर कलाकारांनी देखील तिच्या पोस्टला लाईक करत व कमेंट करत तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App