1 फेब्रुवारीपासून इंधनाच्या किमती तब्बल 500 टक्के वाढणार आहेत
विशेष प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे महागाई वाढून जनजीवन विस्कळीत होते असते. लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. क्युबा या देशातही हे घडणार आहे.Cuba country increased the fuel price by 500 percent
1 फेब्रुवारीपासून इंधनाच्या किमती तब्बल 500 टक्के वाढणार आहेत. त्यामुळे क्युबन जनतेला महागाई वाढण्याची भीती आहे. इंधनाचा तुटवडा आणि महागाईचा भार क्युबन्सवर आधीच आहे. आता त्यांना चिंता सतावत आहे की, इंधनाच्या दरात 500 टक्के वाढ कशी सहन करणार?
इंडिगोचे फ्लाइट तिकीट होणार स्वस्त, 1000 रुपयांनी कमी होऊ शकते किंमत, इंधन शुल्क आकारणार नाही
क्युबा आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोना महामारी, अमेरिकेने लादलेले निर्बंध आणि कमकुवत अर्थव्यवस्था यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.
दरम्यान, सरकारने जाहीर केले आहे की 1 फेब्रुवारी 2024 पासून हवाना, क्युबात एक लिटर मानक गॅसोलीनची किंमत 25 पेसोस (20 यूएस सेंट) ऐवजी 132 पेसोस असेल. एक लिटर प्रीमियम इंधनाची किंमत 30 ऐवजी 156 पेसोस असेल. बजेट तूट कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App