वृत्तसंस्था
द्रास (लडाख ) : कारगिल युद्धात आम्ही लाइन ऑफ कंट्रोल (एलओसी) पार केली नव्हती. याचा अर्थ असा नाही की आम्ही एलओसी पार करू शकत नव्हतो. आम्ही असे करू शकत होतो, करू शकतो आणि गरज पडल्यास तसे करूही, असा इशारा २४व्या कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. ते म्हणाले, जनतेने युद्धासाठी तयार राहिले पाहिजे. अशा वेळी सैनिकांचे समर्थन करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.Cross the LoC if necessary; Prepare for battle; Defense Minister Rajnath’s Warning on Kargil Victory Day
संरक्षणमंत्र्यांनी द्रासमधील कारगिल वॉर मेमोरियल येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही | दलांचे प्रमुखही उपस्थित होते. त्यांनीही कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली पाहिली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी द्रासमधील ‘हट ऑफ रिमेंबरन्स’ संग्रहालयाची पाहणी केली. या संग्रहालयात कारगिल युद्धातील लष्कराच्या शौर्य आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App