विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :आनंद महिंद्राच क्रिकेट प्रेम जग जाहीर आहे . सोशल मिडीयावर ते नेहमीच याबद्दल लिहित असतात.भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत करण्याचा विक्रम केला होता.Cricket Crazy Anand Mahindra: Word is word! Natarajan Anshardul received Thar, sent a special return gift; Thankyou Nattu
या विजयात अनेक युवा खेळाडूंनी मोलाची कामगिरी बजावली होती. या खेळाडूंना आनंद महिंद्रा यांनी बक्षीस म्हणून ‘महिंद्रा थार’ भेट देण्याचे जाहीर केले होते. त्यांनी मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, शुबमन गिल आणि नवदीप सैनी या युवा भारतीय क्रिकेटपटूंना कार भेट देण्याचे जाहीर केले होते.
त्यांनी घोषणा केल्यानुसार नटराजनला आणि शार्दूल ठाकूरला त्यांची थार मिळाली आहे. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर करत महिंद्रांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर नटराजनने रिटर्न गिफ्ट म्हणून गॅबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात घातलेली जर्सी स्वाक्षरी करुन महिंद्रा यांच्यासाठी दिली आहे.
नटराजनने त्याच्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की ‘भारतासाठी क्रिकेट खेळणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता. या मार्गावर पुढे जाणे माझ्यासाठी खूप वेगळे होते. मला जे प्रेम आणि आपुलकी मिळाली, त्याने मी भारावून गेलो आहे. चांगल्या लोकांकडून मिळालेल्या पाठिंबा आणि प्रेरणेमुळे मला पुढे जाण्यासाठी मदत मिळाली आहे.’
नटराजनने पुढे दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की ‘आज मी ही सुंदर महिंद्रा थार चालवून घरी परतलो आहे. मी श्री आनंद महिंद्रा यांचे आभार मानतो की त्यांनी माझा प्रवास ओळखला आणि माझे कौतुक केले. क्रिकेटबद्दल तुम्हाला असलेले प्रेम मोठे आहे. मी तुमच्यासाठी गॅबा कसोटीतील जर्सी स्वाक्षरी करुन पाठवत आहे.’
As I drive the beautiful @Mahindra_Thar home today, I feel immense gratitude towards Shri @anandmahindra for recognising my journey & for his appreciation. I trust sir, that given your love for cricket, you will find this signed shirt of mine from the #Gabba Test, meaningful 2/2 — Natarajan (@Natarajan_91) April 1, 2021
As I drive the beautiful @Mahindra_Thar home today, I feel immense gratitude towards Shri @anandmahindra for recognising my journey & for his appreciation. I trust sir, that given your love for cricket, you will find this signed shirt of mine from the #Gabba Test, meaningful 2/2
— Natarajan (@Natarajan_91) April 1, 2021
या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने 1 वनडे, 3 टी 20 आणि 1 कसोटी सामना खेळताना एकूण 11 विकेट्स घेतल्या.
टी. नटराजन यांच्या या ट्विटला आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट केले, ‘थँक्यू नट्टू. मी ही अमूल्य भेट अभिमानाने परिधान करीन.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App