वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पुढील शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून शाळांमध्ये क्रेडिट सिस्टिम (श्रेयांक) लागू करण्याची योजना आखली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना ६ वी ते १२ वीपर्यंत प्रत्येक वर्गात किमान १२०० तासांचा अभ्यास/शिक्षण पूर्ण केल्यावर ४० क्रेडिट पॉइंट मिळतील. ते सर्व विषयात परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दिले जातील. हे क्रेडिट्स विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेतील गुण/श्रेणीसमोर नोंदवले जातील. प्रत्येकाच्या शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होतील. आत्तापर्यंत देशात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अशी क्रेडिट सिस्टिम कार्यान्वित आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना संस्था किंवा अभ्यासक्रम बदलण्याची सुविधा आहे. सीबीएसई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, क्रेडिट सिस्टिम व्यावसायिक व सामान्य अध्ययनांमध्ये शैक्षणिक इक्विव्हॅलन्सी देते. विद्यार्थ्याला व्यावसायिकऐवजी सामान्य अभ्यासक्रम किंवा त्याउलट बदल करायचा असल्यास क्रेडिट ट्रान्सफरद्वारे शिक्षण प्रणालीमध्ये प्रवेश घेणे सोपे होईल.Credit system to be implemented in CBSE schools now; Students will get 40 points after completing 1200 hours of study
क्रेडिट सिस्टिम म्हणजे काय: ही विकसित देशांच्या शिक्षण व्यवस्थेत प्रचलित आहे. विद्यार्थ्याने अभ्यास करताना किंवा शिकत असताना किती गांभीर्याने घेतला, त्याने किंवा तिने अभ्यासलेल्या शैक्षणिक विषयांची, कौशल्ये आत्मसात केली किंवा कोणत्या गैर-शैक्षणिक उपक्रमात सहभागी होता हे त्यातून समजते.
पर्यायी विषय न घेताही विद्यार्थ्याचा ४० क्रेडिट स्कोअर मान्य असेल. क्रेडिट सिस्टिममुळे विद्यार्थी सहज विषय बदलू शकतील. याचा उद्देश अकॅडमिक स्तरावर व्यावसायिक व सामान्य शिक्षणात समानता आणणे आहे.
सत्र २०२३-२४ पासून क्रेडिट सिस्टीम लागू केल्यास काय होईल याचा तपशील जाहीर झाला आहे. त्यानुसार, ९-१०वी च्या दोन भाषा विषयांसह पाच विषयांमध्ये प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी ७, शारीरिक शिक्षणासाठी २ आणि कला शिक्षणासाठी एक क्रेडिट म्हणजेच एकूण ४० क्रेडिट्स देण्यात येतील. त्याचप्रमाणे १० ते १२ वी च्या सहा विषयांपैकी भाषा विषयांसाठी प्रत्येकी ६, इतर विषयांसाठी प्रत्येकी ७ असे एकूण ४० क्रेडिट्स मिळतील.
सेमिस्टरसह दोनदा बोर्ड परीक्षेची तयारी
इयत्ता तिसरी ते ६ वी आणि इयत्ता ९वी आणि ११वी साठी नवीन एनसीईआरटीची पुस्तके नवीन सत्र २०२४-२५ सुरू होण्यापूर्वी जारी करण्याची तयारी सुरू आहे. सीबीएसई इयत्ता १०वी-१२वीमध्ये सेमिस्टर पद्धतीने दोनदा बोर्ड परीक्षा घेऊ शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App