विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपच्या दक्षिणेतील मिशन 144 मध्ये आज एक नवी भर पडली आहे. काँग्रेसला गेल्या तीन दिवसात तीन धक्के बसले असून आज पणजोबांच्या पावलावर पणतूने पाऊल टाकले आहे. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि त्यावेळच्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे पणतू सी. आर. केशवन यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती धरले आहे. यासाठी त्यांनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या पणजोबांचाच आदर्श ठेवला आहे. CR Kesavan, former Congress leader and great-grandson of India’s first Indian Governor-General, C Rajagopalachari, joins BJP
सी. आर. केशवन हे 22 वर्षांचे काँग्रेस मधले राजकीय नाते तोडून भाजपमध्ये आले आहेत. त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस काँग्रेसचा राजीनामा दिला होता. ते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही सामील झाले नव्हते. मोदी सरकारकडे सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणे, द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला विरोध करणे अशी विविध कारणे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना सांगितली होती. आता ते भाजपमध्ये सामील झाले आहेत.
अर्थात त्यासाठी त्यांनी आपल्यापुढे आपल्या डोळ्यांसमोर आपल्या पणजोबांचाच आदर्श ठेवला आहे. सी. राजगोपालाचारी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे काँग्रेसचे नेते असले तरी त्यांचा जीवनातला अखेरचा राजकीय काळ काँग्रेस बाहेर स्वतंत्र पार्टीत गेला होता. ते स्वतंत्र पार्टीचे संस्थापक होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची मतभेद झाल्यानंतर त्यांनी 1959 मध्ये काँग्रेस मधून बाहेर पडून स्वतंत्र पार्टी या नावाचा राजकीय पक्ष काढला होता. आपल्या जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांनी त्या पक्षाचा जोरदार प्रचारही केला होता. भारताच्या आर्थिक सुधारणांची राजकीय बीजे स्वतंत्र पार्टीच्या आर्थिक धोरणात आढळतात. राजगोपालाचारींच्या हयातीत स्वतंत्र पार्टीचे विविध राज्यांमधून 41 खासदार निवडून आले होते. लोकसभेतला तो मुख्य विरोधी पक्ष ठरला होता.
#WATCH | Delhi: CR Kesavan, former Congress leader and great-grandson of India's first Indian Governor-General, C Rajagopalachari, joins BJP pic.twitter.com/KIuuumUqpc — ANI (@ANI) April 8, 2023
#WATCH | Delhi: CR Kesavan, former Congress leader and great-grandson of India's first Indian Governor-General, C Rajagopalachari, joins BJP pic.twitter.com/KIuuumUqpc
— ANI (@ANI) April 8, 2023
त्यामुळे काँग्रेस मधून बंडखोरी ही सी. आर. केशवन यांना आपल्या पणजोबांच्या वारशाच्या रूपाने मिळाली आहे आणि त्यांनी तिचा वापर करत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे तामिळनाडूत भाजपला एक नवा चेहरा मिळणार आहे दोन दिवसांपूर्वी माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी भाजपमध्ये आले. काल अखंड आंध्र प्रदेशचे अखेरचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी भाजप मध्ये आले आणि आज अशी राजगोपालाचारी यांचे पणतू सी. आर. केशवन भाजपमध्ये आले आहेत. भाजपच्या मिशन 144 ला यातून बळ मिळणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App