CP Radhakrishnan उपराष्ट्रपती पदासाठी मोदींचे पुन्हा सरप्राईज; यादीतली सगळे नावे बाजूला; महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना संधी!!

CP Radhakrishnan

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सतत धक्के देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत वेगळा धक्का दिला. राजकीय पक्षांनी आणि माध्यमांनी चालविलेली यादीतली सगळी नावे बाजूला सर्व मोदींनी वेगळेच नाव उपराष्ट्रपती पदासाठी निवडले. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीची त्यांनी घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विट केले.  CP Radhakrishnan

जगदीश धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आली. त्यामध्ये गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य शेषाद्री चारी यांच्याबरोबर अनेक नावे आघाडीवर ठेवली. यामध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांचीही नावे त्यांनी घेतली. त्याचवेळी विरोधकांकडून मल्लिकार्जुन खर्गे यांचेही नाव समोर आले. यात अनेकांनी जात राजकारणाचा अँगल आणला. पण कुणीही सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची चर्चा केली नव्हती.

पंतप्रधान मोदींनी नेमके तेच नाव निवडले. माध्यमांच्या यादीतली सगळी नावे बाजूला सारून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची घोषणा केली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून उपराष्ट्रपती पदावर पोहोचणारे सी. पी. राधाकृष्णन हे दुसरे नेते ठरणार आहेत. यापूर्वी शंकर दयाळ शर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल होते. काँग्रेसने त्यांना सुरुवातीला उपराष्ट्रपती पदाची संधी दिली आणि नंतर राष्ट्रपती पदावर त्यांना बसविले होते.

CP Radhakrishnan as the Vice Presidential candidate

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात