वृत्तसंस्था
बंगळूर : देशात कोविडची तिसरी लाट सुरू झाली असताना कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार मात्र पदयात्रेवर आडले आहेत. कोविड वगैरे काही नाही. ही सगळी भाजपची नाटके आहेत. काँग्रेसची पाणी पदयात्रा अडविण्यासाठी ते खोटेनाटे आकडे सांगत आहेत, असा सनसनाटी आरोप शिवकुमार यांनी केला आहे. VCOVID all these are BJP plays; Karnataka Congress state president Shivkumar is on foot !!
देशात कोविडचा प्रकोप पाहता खुद्द काँग्रेसने देखील उत्तर प्रदेशातील आपले मेळावे आणि प्रियांका गांधी यांच्या संकल्पनेतील लडकी हूं लढ सकती हूं यांसारखे उपक्रम रद्द केले आहेत किंवा पुढे ढकलले आहेत. तरी देखील शिवकुमार आपल्या पाणी पदयात्रेवर आजून राहिले आहेत.
कर्नाटकात विरोधकांचे महागाईविरोधात आंदोलन, डीके शिवकुमार आणि सिद्धारामय्या बैलगाडीवरून विधानसभेत
बंगलोर मध्ये पाणीटंचाई आहे. या पार्श्वभूमीवर उद्या रविवार पासून काँग्रेसने ही पदयात्रा आयोजित केली आहे. कर्नाटक सरकारने कोविडचा प्रकोप पाहता राज्यामध्ये 144 कलम लागू केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवकुमार यांनी कोविड वगैरे काही नाही. ही सगळी भाजपची नाटके आहेत, असा आरोप केला आहे. मी अनेकदा कर्नाटक सरकारकडे कोविडमध्ये मृत्यू पावलेल्यांची आकडेवारी मागितली. त्यांची नावांची यादी मागितली. परंतु कर्नाटक सरकारने यादी दिली नाही. सरकार खोटेनाटे आकडे फुगवून सांगत आहे. त्यामुळे पाणी पदयात्रा काढणारच असल्याचे शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
या पाणी पदयात्रेत सुरुवातीला उद्या कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे देखील सहभागी होणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App