वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : अमेरिकेतील २ ते १८ वयोगटातील मुलांना कोवॅक्सिनचे लसीकरणास मंजुरी द्यावी, अशी मागणी भारत बायोटेकच्या वतीने केली आहे. भारत बायोटेकसोबत अमेरिकेतील सहयोगी कंपनी ओक्युजेनच्या वतीने ही मागणी केली आहे. सध्या अमेरिकेत १८ वर्षांखालील मुलांना अमेरिकेच्या फायझरची लस देण्यास मंजुरी दिली आहे. Covaxin approval requested in US for ages 2-18 by Bharat Biotech’s partner
भारत बायोटेकचे अमेरिकेतील भागीदार कंपनी ओक्युजेनचे सीईओ म्हणाले की, जर मान्यता मिळाली तर, ज्या पालकांना मुलांना लस देण्यासाठी आणखी एक पर्याय त्यांना आणखी एक पर्याय कोवॅक्सिनच्या रूपाने मिळेल.
विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिन लसीला मान्यता दिली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही लस भारतात वापरण्यास अगोदरच मान्यता दिली असून ती अनेकांना टोचली आहे. दुसरीकडे भारत बायोटेकने भारतात विकसित केलेल्या कोवॅक्सिनला गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरास मान्यता मिळाली.
आता यूएस आणि कॅनडासाठी भारत बायोटेकचे भागीदार, यूएस अन्न आणि औषध प्रशासनाला बालरोगाच्या आपत्कालीन वापर अधिकृततेसाठ विनंती सादर केली आहे.भारत बायोटेक द्वारे भारतातील २-१८ वर्षे वयोगटातील ५२६ मुलांवर केलेल्या चाचणीत ही लस उपयुक्त ठरली आहे. बालरोग क्लिनिकल चाचणीच्या निकालांवर आधारित ही मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App