कोरोनावरील स्वदेशी लस कोवॅक्सिनचे उत्पादन पुढील सहा महिन्यांत दहा पटीने वाढेलअसा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कोरोनवरील उपचारासाठी उपयुक्त असलेल्या रेमेडिसीव्हरचे उत्पादन येत्या मे महिन्यापर्यंत दुपटीने वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.Covacin production will increase tenfold in the next six months, Drs. Harsh Vardhan believes
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कोरोनावरील स्वदेशी लस कोवॅक्सिनचे उत्पादन पुढील सहा महिन्यांत दहा पटीने वाढेलअसा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कोरोनवरील उपचारासाठी उपयुक्त असलेल्या रेमेडिसीव्हरचे उत्पादन येत्या मे महिन्यापर्यंत दुपटीने वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाची लस १८ वर्षांवरील सर्वांना देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. हर्ष वर्धन यांनी लसीचे उत्पादन दहा पट वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. देशात सध्या सर्वत्र रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा आहे.
याबाबत डॉ. हर्ष वर्धन म्हणाले मे महिन्यापर्यंत रेमेडेसिव्हीर उत्पादन दुप्पट म्हणजे दर महिन्याला ७१.४ लाख डोस होणार आहे. देशातील २० कंपन्यांना उत्पादन वाढविण्यासाठी एक्सप्रेस परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर दरावर नियंत्रण आणि काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहे.
देशातील ऑक्सीजन पुरवठ्याबाबत डॉ. हर्ष वर्धन म्हणाले,ऑक्सिजनची सर्वाधिक गरज असलेल्या राज्यांना सर्वात प्रथम पुरविला जाईल. यासाठी ऑक्सीजनचे निर्मिती प्रकल्प कमाल क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. औद्योगिक वापरासाठीचा सर्व ऑक्सीजन वैद्यकीय वापरासाठी वळविण्यात आला आहे.
महाराष्ट्राला ऑक्सीजनची सर्वाधिक गरज आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी डॉ. हर्ष वर्धन यांनी संवाद साधला. त्यांना पुरेसा आॅक्सीजन पुरविण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी रेल्वेकडून ऑक्सीजन रेल्वे सुरू करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांत देशाच्या विविध भागात रेल्वेद्वारे ऑक्सीजन सिलेंडर आणि लिक्विड ऑक्सीजन पुरविला जाणार आहे.करोनावरील लसीची निर्मिती आणि उत्पादनासाठी केंद्र सरकारने सुविधा आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारत बायोटेक कंपनीसाठी निधी जाहीर केला आहे. यामुळे एप्रिमध्ये कोवॅक्सिन लसीचे उत्पादन १ कोटीहून अधिक डोसपर्यंत वाढवण्यात आले आहे. हे उत्पादन जुलै- ऑगस्टमध्ये ६ ते ७ कोटी डोसपर्यंत नेण्यात येईल. आणि सप्टेंबरपर्यंत हे उत्पादन १० कोटी डोस इतके होईल, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App