राघव चढ्ढा राज्यसभा सचिवालयाच्या नोटीसविरोधात न्यायालयात पोहोचले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याच्या प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. कोर्टाने राघव चढ्ढा यांना टाइप 7 बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. Court slaps Raghav Chadha No right to take possession of government house
राज्यसभा सचिवालयाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की राज्यसभा खासदार असल्याने राघव चढ्ढा यांना टाइप 6 बंगला मिळण्याचा अधिकार आहे, टाइप 7 बंगला नाही. राघव चढ्ढा राज्यसभा सचिवालयाच्या नोटीसविरोधात न्यायालयात पोहोचले होते.
या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने राघव चड्ढा यांना बंगला रिकामा करण्यास घातलेली अंतिम स्थगिती हटवली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने राघव चढ्ढा यांना बंगला रिकामा करण्यास सांगितले आहे. तसेच, न्यायालयाने राज्यसभा सचिवालयाचा बंगला रिकामा करण्याची नोटीस कायम ठेवली आहे.
कोर्टाने म्हटलं आहे की, राज्यसभेचे सदस्य म्हणून राघव चड्ढा त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात सरकारी निवासस्थानावर ताबा ठेवण्याचा अधिकार आहे असं म्हणू शकत नाहीत. शासकीय निवासस्थानांचं वाटप हा त्यांना दिलेला विशेषाधिकार आहे.
Court slaps Raghav Chadha No right to take possession of government house
महत्वाच्या बातम्या
- कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; काँग्रेस काढणार उत्तर प्रदेशात दलित गौरव यात्रा!!
- Mahadev Betting App Case : रणबीर कपूरनंतर कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांना ‘ED’चे समन्स!
- विनायक ग्रुप आणि महाराष्ट्र सपा अध्यक्ष अबू आझमी यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाचे छापा
- भाजपने चिन्ह वॉशिंग मशीन घ्यावे; पण त्या मशीनमधून धुतलेले अजितदादा मुख्यमंत्री झाले की पहिला हार सुप्रिया सुळे घालणार!!