• Download App
    भाजपने चिन्ह वॉशिंग मशीन घ्यावे; पण त्या मशीनमधून धुतलेले अजितदादा मुख्यमंत्री झाले की पहिला हार सुप्रिया सुळे घालणार!! Supriya Sule will wear the first garland when Ajit pawar becomes the Chief Minister

    भाजपने चिन्ह वॉशिंग मशीन घ्यावे; पण त्या मशीनमधून धुतलेले अजितदादा मुख्यमंत्री झाले की पहिला हार सुप्रिया सुळे घालणार!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भाजपने आता कमळ चिन्हाऐवजी वॉशिंग मशीन हे निवडणूक चिन्ह घ्यावे, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदनिष्ठ गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला, पण याच वॉशिंग मशीन मधून धुतलेले अजित पवार मुख्यमंत्री झाले, की पहिला हार मात्र सुप्रिया सुळे घालायला जाणार हे शरद पवारांना चालणार आहे का??, हा सवाल त्यामुळे तयार झाला आहे. Sharad pawar says, BJP should choose washing machine as its symbol, but if BJP makes ajit pawar made chief minister, then supriya sule will garland him first

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे. दोन्ही गटांनी विशिष्ट संख्येमध्ये निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहे. त्यामुळे खरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदनिष्ठ की अजितनिष्ठ, याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे.



    या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज राजधानी नवी दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आपल्या गटाची बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी भाजपला टोमणे मारले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते पद शोभत नाही, असे ते म्हणाले. इतकेच नाही, तर भाजपने आता कमळ चिन्हाऐवजी वॉशिंग मशीन हे चिन्ह घ्यावे, असा टोमणाही शरद पवारांनी मारला.

    पण दुसरीकडे नांदेडमध्ये मात्र सुप्रिया सुळे यांना अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी प्रश्न विचारल्या बरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला. देवेंद्र फडणवीस यांना विश्वास नसेल, पण माझा भाऊ म्हणून मला विश्वास आहे. त्यामुळे मी अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर पहिला हार घालायला पुढे जाईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    याचा अर्थ भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतलेले अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पहिला हार घालायला सुप्रिया सुळे धावणार आहेत, पण भाजपला टोमणे मारणाऱ्या शरद पवारांना हे चालणार आहे का??, असा सवाल तयार झाला आहे.

    Sharad pawar says, BJP should choose washing machine as its symbol, but if BJP makes ajit pawar made chief minister, then supriya sule will garland him first

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Uddhav Thackeray : उसने अवसान आणत उध्दव ठाकरे अमित शहांवर बरसले अन् शरद पवारांवर घसरले

    महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले आहेत

    Devendra Fadnavis एकटे फडणवीसच “ॲक्टिव्ह”, सुप्रिया सुळेंची कबुली; पवारांच्या सत्तेच्या संस्कारात वाढलेल्यांची संपली का “दादागिरी”??