आता महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांना समन्स पाठवले असून महादेव बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात वेगवेगळ्या तारखांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. Mahadev Betting App Case ED summons to Kapil Sharma Huma Qureshi after Ranbir Kapoor
याप्रकरणी तपास यंत्रणेने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला यापूर्वीच समन्स पाठवले असून ६ ऑक्टोबर रोजी रायपूर विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कपूर यांनी दोन आठवड्यांचा वेळ मागितल्याचे मानले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अलीकडेच तीन कलाकारांना समन्स पाठवण्यात आले असून त्यांना वेगवेगळ्या तारखांना एजन्सीच्या रायपूर कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
यंत्रणा अँटी मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करेल आणि अॅपच्या प्रवर्तकांनी कथितपणे केलेले पेमेंट आणि पैसे मिळवण्याची पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे या कलाकारांना या प्रकरणात आरोपी बनवले जाणार नाही, असे मानले जात आहे. या कलाकारांनी महादेव अॅपचे प्रमोशन केल्याचे समजते आणि काहींनी अॅपच्या प्रवर्तकांपैकी एकाच्या परदेशी लग्नात पाहुण्यांचे मनोरंजन केले होते.
Mahadev Betting App Case ED summons to Kapil Sharma Huma Qureshi after Ranbir Kapoor
महत्वाच्या बातम्या
- सुपरस्टार राम चरण याच्या 41 दिवसाच्या व्रताची सांगता!
- पालकमंत्री पद मिळवून अजितदादांनी शिंदे गटावर मात केल्याची बातमी; पण दादांना राजकीय किंमत करावी लागणार चुकती!!
- आशियाई क्रीडा स्पर्धेत ७१ पदकं जिंकून भारताने स्वतःचाच विक्रम मोडत रचला इतिहास
- जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार