• Download App
    राघव चढ्ढा यांना न्यायालयाकडून झटका,''सरकारी घरावर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही'' Court slaps Raghav Chadha No right to take possession of government house

    राघव चढ्ढा यांना न्यायालयाकडून झटका,”सरकारी घरावर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही”

    राघव चढ्ढा राज्यसभा सचिवालयाच्या नोटीसविरोधात न्यायालयात पोहोचले होते.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याच्या प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. कोर्टाने राघव चढ्ढा यांना टाइप 7 बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. Court slaps Raghav Chadha No right to take possession of government house

    राज्यसभा सचिवालयाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की राज्यसभा खासदार असल्याने राघव चढ्ढा यांना टाइप 6 बंगला मिळण्याचा अधिकार आहे, टाइप 7 बंगला नाही. राघव चढ्ढा राज्यसभा सचिवालयाच्या नोटीसविरोधात न्यायालयात पोहोचले होते.

    या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने राघव चड्ढा यांना बंगला रिकामा करण्यास घातलेली अंतिम स्थगिती हटवली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने राघव चढ्ढा यांना बंगला रिकामा करण्यास सांगितले आहे. तसेच, न्यायालयाने राज्यसभा सचिवालयाचा बंगला रिकामा करण्याची नोटीस कायम ठेवली आहे.

    कोर्टाने म्हटलं आहे की, राज्यसभेचे सदस्य म्हणून राघव चड्ढा त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात सरकारी निवासस्थानावर ताबा ठेवण्याचा अधिकार आहे असं म्हणू शकत नाहीत. शासकीय निवासस्थानांचं वाटप हा त्यांना दिलेला विशेषाधिकार आहे.

    Court slaps Raghav Chadha No right to take possession of government house

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही