देशातील सर्वात वयोवृद्ध खासदार शफीकुर रहमान बारक यांचे निधन

1996 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांचे मंगळवारी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. खासदार बर्क हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिन्याच्या सुरुवातीला प्रकृती खालावल्याने त्यांना मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. बर्क यांच्या निधनामुळे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.Countrys oldest MP Shafiqur Rehman Barak passed away



शफीकुर रहमान बर्क यांचा जन्म 11 जुलै 1930 रोजी उत्तर प्रदेशातील संभल येथे झाला होता. समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. 1996 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. त्याचवेळी त्यांनी 2014 मध्ये बसपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. बर्क चार वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार राहिले आहेत.

नुकताच शफीकुर रहमान बर्क यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते संसद भवनासमोर भाजप खासदार हरनाथ सिंह यादव यांच्याशी बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये भाजप खासदार त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना दिसत आहेत.

Countrys oldest MP Shafiqur Rehman Barak passed away

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात