विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – येत्या दशकात कोरोनाचा विषाणू सर्दी-खोकल्याच्या सामान्य विषाणूसारखा होणार असल्याचा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे.Cororna will become seasonal flue
‘व्हायरसेस’ या नियतकालिकात ते प्रकाशित झाले असून संशोधकांनी कोरोनाच्या सध्याच्या साथीवर आणि मानवी शरीराच्या बदलत्या प्रतिकारशक्तीवर आधारित गणितीय प्रारूपाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे.
कोरोना विषाणुविरुद्ध मानवी प्रतिकारशक्तीच्या आधारे हे गणितीय प्रारुप तयार केले आहे. कोरोना साथीचे विश्लेषण करून अधिक लोकसंख्येला दीर्घकाळासाठी सौम्य संसर्गाची शक्यता वर्तविली.
लस किंवा संसर्गानंतर प्रतिकारशक्ती वाढून कोरोना सौम्य होण्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.अमेरिकेतील उटाह विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्रा.फ्रेड ॲडलर याबाबत म्हणाले,की समूह प्रतिकारशक्ती वाढल्यानंतर येत्या दशकात कोरोनाची तीव्रता कमी होऊ शकते.
विषाणुतील बदलांपेक्षा मानवी प्रतिकारशक्तीतील बदलाचा कोरोना साथीवर प्रभाव पडू शकतो. कोरोना साथीच्या सुरुवातीला मानवी प्रतिकारशक्ती या विषाणुसाठी तयार नव्हती. मात्र, जशी प्रौढ व्यक्तींची प्रतिकारशक्ती संसर्ग किंवा लसीकरणातून वाढत जाईल,
तशी कोरोना संसर्गाची तीव्रताही कमी होत जाईल. मुले विषाणूच्या प्रथमच संपर्कात आली तरी नैसर्गिकरित्या त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका कमी असतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App