कोरोनामुळे आव्हाने परंतु व्हायरस भारताची गती रोखू शकत नाही, आर्थिक निर्देशक कोविडपूर्व काळापेक्षा चांगले, पंतप्रधानांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोविडपूर्व काळापेक्षा अनेक आर्थिक निर्देशक चांगले आहेत. कोरोनाव्हायरसने देशासमोर आव्हाने उभी केली आहेत परंतु हा व्हायरस भारताची गती रोखू शकत नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.Corona poses challenges but virus can’t stop India’s pace, Economic indicators are better than ever before precovid time, says PM

आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 10 वा हप्ता जारी केला. यानिमित्ताने पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू येथील शेतकरी उत्पादक संघटनेच्या निवडक सदस्यांशी संवाद पंतप्रधानांनी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, देशाचे अनेक आर्थिक निर्देशक कोविडपूर्व काळापेक्षा चांगले काम करत आहेत. आज आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर ८% पेक्षा जास्त आहे.



विक्रमी विदेशी गुंतवणूक भारतात आली आहे. आपल्या परकीय चलनाचा साठा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. जीएसटी संकलनात जुने रेकॉर्ड मोडण्यात आले आहे. नियार्तीच्या बाबतीत, विशेषत: शेतीच्या बाबतीतही आम्ही नवीन विक्रम केले आहे.

मोदी म्हणाले, २०२१ मध्ये युपीआय वापरून 70 लाख कोटींहून अधिक व्यवहार झाले. भारतात 50,000 हून अधिक स्टार्ट-अप कार्यरत आहेत, त्यापैकी 10,000 गेल्या सहा महिन्यांत सुरू करण्यात आले आहेत. २०२२ मध्ये आम्हाला आमचा विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे.

कोरोना व्हायरसने आव्हाने उभी केली आहेत पण तो आपला वेग रोखू शकत नाही. भारत कोरोनाविरुद्ध अत्यंत सावधगिरीने लढेल आणि आपले राष्ट्रीय हित साधेल.एका संस्कृत श्लोकाचा हवाला देत मोदी म्हणाले, डर, भय, आशंकाओं को छोडकर हमे शक्ती और समर्थन को याद करना है. राष्ट्र प्रथम ही भावना आज प्रत्येक भारतीयाची भावना बनत आहे.

आज भारत एकीकडे आपली स्टार्ट-अप इकोसिस्टम मजबूत करत असताना आणि त्याच वेळी तितक्याच अभिमानाने आपल्या संस्कृतीला सशक्त करत आहे. काशी विश्वनाथ धाम सुशोभीकरण प्रकल्प ते केदारनाथ धाम विकास प्रकल्प; आदि शंकराचार्यांच्या समाधीच्या पुनर्बांधणीपासून ते भारतातून चोरलेल्या शेकडो मूर्ती परत आणण्यापर्यंत अनेक गोष्टी झाल्या आहेत.

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीपासून धोलावीरा आणि दुर्गा पूजा उत्सवाला जागतिक वारसा दर्जा मिळण्यापर्यंत भारताकडे खूप काही आहे. आम्ही आमचा वारसा मजबूत करण्यासाठी काम करत आहोत. आणि त्यामुळे पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांमध्ये वाढ होईल.

Corona poses challenges but virus can’t stop India’s pace, Economic indicators are better than ever before precovid time, says PM

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात