कर्नाटक मधील शाळेत 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

विशेष प्रतिनिधी

कोडागू : कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यातील निवासी शाळा जवाहर नवोदय विद्यालयमध्येजवळपास 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 10 मुली आणि 22 मुलांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची एका आठवड्यापूर्वी कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. या गोष्टींमुळे कर्नाटकमध्ये कोरोनाची चिंता मात्र वाढलेली आहे.

Corona infection in 32 students at a school in Karnataka

विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शाळेत एकूण 270 विद्यार्थी आहेत. 32 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या सर्वांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे.


Corona In India : देशात गेल्या २४ तासांत ४६,७५९ नवीन रुग्ण, ५०९ रुग्णांचा मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या ३.६० लाखांवर


शाळेच्या मुख्याध्यापकांनी एनडीटीव्ही सोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून चिंता करण्याचे कोणतेही कारण नाहीये. शाळेतील सर्व परिसर सॅनिटायझर करण्यात आला असून योग्य ती सर्व काळजी शाळेतर्फे घेतली जात आहे. फक्त यामुळे शाळेच्या टाइमटेबल बिघडले आहे अशी चिंता शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली आहे.

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर शाळा अधिकारी शाळेत पोहोचले.

Corona infection in 32 students at a school in Karnataka

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात