आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Corona भारतात पुन्हा एकदा कोरोनाने (कोविड-१९) हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्याची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत ११ राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्याच वेळी, केरळमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ दिसून येत आहे, धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने अलर्ट जारी केला आहे. देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २५७ वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी लोकांना विशेष आवाहन केले आहे.Corona
भारतातील काही भागात कोरोना साथीचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. देशातील ११ राज्यांमध्ये आतापर्यंत सक्रिय रुग्ण आढळले आहेत. दक्षिणेकडील केरळ राज्यात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. येथील सक्रिय रुग्णांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. मे महिन्यात राज्यात १८२ कोविड प्रकरणांची पुष्टी झाली, त्यापैकी ५७ कोट्टायममधील, ३४ एर्नाकुलममधील आणि ३० तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील होते. दरम्यान, आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता, आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्यस्तरीय रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) ची बैठक बोलावली होती. बैठकीत कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ओमिक्रॉन JN1 LF.7 आणि NB.1.8 चे उप-प्रकार आग्नेय आशियामध्ये वेगाने पसरत आहेत, त्यामुळे आपणही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करताना वीणा जॉर्ज म्हणाल्या की, जर लक्षणे दिसली तर नक्कीच मास्क घाला. जिथे जिथे कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत तिथे प्रोटोकॉलचे पालन करा.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की, सध्या भारतात कोरोनाची कोणतीही मोठी लाट दिसून येत नाही. १ जानेवारी ते २० मे पर्यंत देशात फक्त २५७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतातील कोविड-१९ ची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. LF.7 आणि NB.1.8 वेगाने पसरत आहेत परंतु त्यांची तीव्रता जास्त नाही. ज्या लोकांना सर्दी, घसा खवखवणे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे त्यांनी मास्क घालावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App